Marriage in Same Gotra: एकाच गोत्रात लग्न? जीवनात खरंच येते मोठे वादळ? अडचणींचा करावा लागतो सामना?

Marriage in Same Gotra: हिंदू धर्मात लग्न हा करार नाही तर सात जन्माची साथ मानली जाते. हिंदू धर्मात विवाह संस्थेला महत्त्व आहे. तर त्यासोबतच लग्न ठरवताना वधू आणि वर हे एकाच गोत्रातील तर नाही ना याची कसून चौकशी करण्यात येते. असे विवाह टाळले जातात. गोत्र एकत्र असल्यावर वैवाहिक जीवनात मोठं संकट येत का?

Marriage in Same Gotra: एकाच गोत्रात लग्न? जीवनात खरंच येते मोठे वादळ? अडचणींचा करावा लागतो सामना?
एकाच गोत्रात लग्न
Image Credit source: फ्रीपीक
| Updated on: Apr 28, 2026 | 2:54 PM

Marriage in Same Gotra: हिंदू धर्मातील 16 संस्कारांमध्ये विवाह हा एक संस्कार मानल्या जातो. लग्नानंतर गृहस्थ जीवनांची सुरुवात होते. हिंदू धर्मात विवाह हा करार नाही तर सात जन्माची साथ मानली जाते. लग्न करताना अनेक परंपरांचं पालन करण्यात येते. लग्न जुळवण्यापासून ते लग्न लागेपर्यंत अनेक गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. यामध्ये गोत्राला ही अत्यंत महत्व आहे. वधू आणि वर हे एकाच गोत्राच नकोत असे मानले जाते. एकाच गोत्रात लग्न ठरत नाही. लग्न केले जात नाही. पण त्यामागे काय आहे कारण?

गोत्र म्हणजे काय?

गोत्र या शब्दाचा अर्थ वंश अथवा कूळ असे होते. हिंदू धर्मात कुळाची सुरुवात ऋषींपासून झाल्याचे मानले जाते. या ऋषी मुनींआधारे गोत्राची विभागणी झाली आहे. प्रत्येक गोत्राचा एक ऋषीमुनी असतो. त्याच्या नावाने त्या गोत्राची सुरुवात होते. कश्यप गोत्र, भारद्वाज गोत्र, गौतम गोत्र, एका गोत्राच्या लोकांना एकाच पूर्वजांचे वंशज मानले जाते. त्यामुळे एकाच गोत्राच्या लोकांमध्ये रक्ताचे नाते संबंध असल्याचे मानले जाते.

मग एकाच गोत्रात का नाही करत लग्न?

एकाच गोत्रात लग्न न करण्यामागे काही कारण आहेत. हिंदू धर्म ग्रंथानुसार, एकाच गोत्रातील लोक हे भाऊ आणि बहीण असतात. कारण ते एकाच ऋषीचे वंशज असतात. त्यामुळे एकाच ऋषीच्या गोत्रात विवाह करणे निषिद्ध मानले जाते. भावा-बहिणीत लग्न होत नाही. असे जर केले तर ते ऋषी परंपरा आणि हिंदू विवाह परंपरेचे उल्लंघन मानले जाते. एकाच गोत्रात लग्न केल्यास विवाह दोष लागतो. त्यामुळे वधू आणि वराच्या आणि नंतरच्या संततीत अनेक अडचणी येतात. या अडचणी मानसिक, शारीरिक आणि इतर असू शकतात. अशा विवाहातून जे मूल जन्माला येते ते कोणता तरी आजार, रोग घेऊनच जन्माला येते असे मानले जाते.

वैज्ञानिक कारणही समजून घ्या

ही केवळ धार्मिक मान्यताच आहे असे नाही. जर एकाच गोत्रात लग्न झाले तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे विज्ञान सांगते. विज्ञानानुसार, एकाच गोत्रात, एकाच कुळात विवाह केला तर मुलात अनुवांशिक दोष तयार होतो. त्यांना मानसिक आणि शारीरिक व्याधीचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात पुढे अडचणी येतात. गुणसूत्रांवर ही त्याचा परिणाम दिसून येतो.

Follow Us