AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआय तातडीने बदलणार संघ, ऐनवेळी असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेत दोन सामने रंगणार आहे. या सामनापूर्वी एक बातमी समोर आली आहे. ज्याने भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआय तातडीने बदलणार संघ, ऐनवेळी असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
| Updated on: Aug 02, 2026 | 2:19 PM
Share

आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेला सुरुवात 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि चाहते एका बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. पण ती बातमी समोर येताच भारतीय संघ आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. वृत्तानुसार, त्याच्या डाव्या गुडघ्याचा त्रास अजूनही कायम असल्याने वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती दिली आहे. बुमराहची अनुपस्थिती भारतीय संघासाठी एक मोठे नुकसान आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना 15 ऑगस्ट रोजी सुरू होणार असून, दुसरी कसोटी 23 ऑगस्ट रोजी सुरू होईल.

श्रीलंका मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर करताना, बीसीसीआयने म्हटले होते की जसप्रीत बुमराहचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. काही दिवसांपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची बातमी समोर आली होती, परंतु अलीकडील माध्यमांतील वृत्तांनुसार परिस्थिती वेगळी आहे. बुमराहला अजूनही त्याच्या डाव्या गुडघ्याचा त्रास जाणवत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्राथमिक तपासणीनंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी, बीसीसीआय या वेगवान गोलंदाजाला मैदानात उतरवण्याची घाई करत नाहीये. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जखमी झाला होता. पहिले दोन सामने खेळल्यानंतर, त्याने गुडघ्याच्या त्रासाची तक्रार केली आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्याला तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातून वगळण्यात आले.

यापूर्वी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि एकमेव कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. तो आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही अनुपस्थित होता. आता या मालिकेकतून कसोटीत पुनरागमन करण्याची संधी होती पण आता ती मिळालेली नाही.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

Follow Us
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा