
हिंदू धर्मामध्ये दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गाष्टमीचा दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्यापूजेमध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश केल्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होतो. तुमच्या आयुष्यामधील महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील आणि प्रगती होत नसेल तर तुम्ही मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या गोष्टी केल्यामुळे सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या मनामधील विचार सकारात्मक ठेवा.
हिंदू धर्मानुसार, प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल देसून येतात. तुमच्या घरातील वातावरण सकारात्नक करण्यासठी मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी काही विशेष उपाय करा. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक बदल दिसून येतील आणि तुम्हाला कामामध्ये प्रगती मिळेल. या दिवशीी उपास आणि पूजा केल्यामुळे दुर्गा देवीचा भक्तांवर आशिर्वाद राहातो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
मासिक दुर्गाष्टमी हा शक्तीची देवी दुर्गेच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते. मासिक दुर्गाष्टमीला उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि या दिवशी खऱ्या मनाने देवी दुर्गेची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे घरात नेहमीच आनंद राहतो.
मासिक दुर्गाष्टमी पूजा विधी….
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी, सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.
पूजास्थळ स्वच्छ करा आणि माँ दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
पूजा साहित्यात लाल फुले, चंदन, धूप, दिवा, नैवेद्य, नारळ, फळे, पंचामृत इत्यादींचा समावेश करा.
दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती, सिद्ध कुंजिका स्तोत्र इत्यादींचे पठण करा.
पूजा करताना, “ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडये विच्छे” या मंत्राचा 108 वेळा जप करा.
धूप, दिवे लावा आणि दुर्गा मातेची आरती करा आणि प्रसाद वाटा.
दुसऱ्या दिवशी, ब्राह्मणांना किंवा गरजूंना जेवण देऊन उपवास संपवा.
दुर्गा मातेच्या पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश करा….
लाल फुले : आई दुर्गाला लाल फुले खूप आवडतात. तुम्ही दुर्गा देवीला गुलाब, जास्वंद किंवा कोणतेही लाल फूल अर्पण करावे.
लाल चुनरी : दुर्गा मातेला लाल चुनरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
मेकअपच्या वस्तू: दुर्गा देवीला बांगड्या, बिंदी, सिंदूर इत्यादी मेकअपच्या वस्तू अर्पण करा.
फळे आणि मिठाई: देवी दुर्गाला फळे आणि मिठाई अर्पण करावी.
पंचामृत : पंचामृत हे अतिशय पवित्र मानले जाते. तुम्ही दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल मिसळून पंचामृत बनवू शकता आणि ते देवी दुर्गाला अर्पण करू शकता.
दिवा आणि धूप : दुर्गा देवीच्या पूजेदरम्यान दिवा आणि धूप लावणे खूप शुभ आहे.
दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशती : दुर्गा देवीच्या पूजेदरम्यान दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.
कन्या पूजन : मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी मुलीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते.
असे मानले जाते की मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच्या पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सकारात्मक बदल येतात. यामुळे पूजेचा पूर्ण लाभ होतो. या दिवशी पूजा केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.