Vivah Muhurat 2022 | पुन्हा ऐकू येणार बँड-बाजा,सनई चौघाड्यांचा सूर, नवीन वर्षात लग्नाचा हंगाम, जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त

| Updated on: Dec 06, 2021 | 3:23 PM

लग्नाचा विचार केला जातो तेव्हा सर्व प्रथम शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो. मागील वर्ष 2021 च्या तुलनेत नवीन वर्ष 2022 मध्ये लग्नासाठी खूप शुभ मुहूर्त आहे.

Vivah Muhurat 2022 | पुन्हा ऐकू येणार  बँड-बाजा,सनई चौघाड्यांचा सूर, नवीन वर्षात लग्नाचा हंगाम, जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त
लग्न समारंभांवरील निर्बंधांना आव्हान
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही काम करण्या आधी पंचांगातील मुहूर्त पाहीला जातो. साधारण तुळशीच्या लग्नानंतर सर्वकडे लगीनघाई सुरु होते. अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाचा विचार केला जातो तेव्हा सर्व प्रथम शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो. मागील वर्ष 2021 च्या तुलनेत नवीन वर्ष 2022 मध्ये लग्नासाठी खूप शुभ मुहूर्त आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सनई वाजतील. या वर्षात केवळ तीन महिनेच लग्नासाठी मुहूर्त दाखवत नाही आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे लग्नसराईचा हंगाम मंदावला होता, मात्र आता थोडा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा बँड-बाजाचा आवाज ऐकू येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 2022 मधील शुभ मुहूर्त

या 3 महिन्यांत लग्न होणार नाही
चातुर्मासामुळे 2022 वर्षामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत लग्नाचा एकही मुहूर्त होणार नाही.

जानेवारी 2022:  या महिन्याच्या 22, 23, 24 आणि 25 तारखेला लग्न करणे शुभ राहील.
फेब्रुवारी 2022: फेब्रुवारीमध्ये 5, 6, 7, 9, 10, 11, 12, 18, 19, 20 आणि 22 हे शुभ काळ आहेत.
मार्च 2022: मार्चमध्ये फक्त 2 शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या 4 आणि 9 तारखेला लग्न करणे शुभ राहील.
एप्रिल २०२२: या महिन्यात १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
मे 2022: मे महिन्यात अक्षय्य तृतीया 2 आणि 3 व्यतिरिक्त, 9, 10, 11, 12, 15, 17, 18, 19, 20, 21, 26, 27 आणि 31 तारखेला लग्न करणे शुभ राहील.
जून 2022: 1, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 17, 23 आणि 24 जूनला विवाह करणे शुभ राहील.
जुलै 2022: जुलैमध्ये 4, 6, 7, 8 आणि 9 शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर २०२२:  या महिन्यात 25, 26, 28 आणि 29 तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे.
डिसेंबर २०२२: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ तारखेला शुभ मुहूर्त असेल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा