
हिंदू धर्मात पंचक काळाचे विशेष महत्त्व आहे, जो शुभ किंवा मंगल कार्यांसाठी योग्य मानला जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार या काळामध्ये शुभकार्य केल्यास त्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. पंचक हा काळ आपल्या सर्वांसाठीच अशुभ मानला जातो. या काळामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडू शकतात. धार्मिक ग्रंथांमध्ये पंचक काळा संदर्भात काही नियम सांगितले आहेत. पंचक म्हणजे चंद्र कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करण्याचा काळ. मे 2025 मध्ये, पंचक 20 मे पासून सुरू झाला आहे. पंचक दरम्यान अनेक शुभ कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो, परंतु या काळात काळ्या तीळाचा वापर शुभ राहण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
पंचक दर महिन्याला सुमारे 5 दिवस असतो. पंचक दरम्यान काही कामे निषिद्ध मानली जातात. तथापि, तीळांसोबत काही उपाय केल्यास पंचकाचे अशुभ परिणाम टाळता येतात. पंचक काळामध्ये सांगितलेल्या काही विशेष नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामधील अडथळे कमी होतात त्यासोबतच नकारात्मकता दूर होते. अशा परिस्थितीत, मे महिन्याच्या पंचकात काळ्या तीळाचे कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया.
पंचक दरम्यान काळे तीळ विशेषतः उपयुक्त मानले जातात. काळ्या तीळाचा वापर केल्याने पंचकाचे दुष्परिणाम शांत राहतात आणि जीवनात शुभफळ येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पंचकात काळे तीळ वापरल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आनंद आणि समृद्धी येते.