AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpanchami 2023 : या वर्षी नागपंचमीला जुळून येत आहे विशेष योग, मुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व

हिंदू धर्मात सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. त्यामुळे या दिवशी नागांची देवता महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Nagpanchami 2023 : या वर्षी नागपंचमीला जुळून येत आहे विशेष योग, मुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व
नागपंचमीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 14, 2023 | 5:56 PM
Share

मुंबई : शिवभक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. नागपंचमी (Nagpanchami 2023) हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो, या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. भगवान शिव आपल्या गळ्यात नाग देवता धारण करतात. यावर्षी नागपंचमीला एक अतिशय शुभ संयोग घडत आहे, त्यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्यास विशेष लाभ होईल. यासोबतच जर पत्रिकेत काल सर्प दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्याची चांगली संधी आहे.

नागपंचमी 2023 तारीख

हिंदू दिनदर्शीकेनुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:21 पासून सुरू होईल आणि 22 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:00 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार नागपंचमी 21 ऑगस्ट, सोमवारी साजरी केली जाईल. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित असल्याने आणि नाग भगवान शिवाचे भक्त असल्याने सोमवारी येणारी नागपंचमी अत्यंत शुभ मानली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकराची पूजा केल्याने सर्पदंश आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो. यासोबतच भगवान शंकराची पूजा केल्याने ग्रह दोष दूर होतात. विशेषत: काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. नागपंचमी सोमवारी आल्याने यावेळी नागपंचमी आणखी विशेष आहे.

अर्थार्जनासाठी नागपंचमीची अशी पूजा करा

सापांना संपत्तीचे रक्षक मानले गेले आहे. नागदेवतेची पूजा केल्याने भरपूर संपत्ती मिळते. नागपंचमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच भगवान शिवाचे स्मरण करा. जर तुम्ही नागपंचमीचा उपवास करत असाल तर व्रताचा संकल्प करा. यानंतर पाटावर नागाची मूर्ती बनवून दुधाचा अभिषेक करावा. त्यांना फळे, फुले, मिठाई अर्पण करा. धुप लावा शेवटी नागपंचमीची आरती करावी. पत्रिकेत काल सर्प दोष असल्यास शिवलिंगावर चांदीच्या नागाची जोडी अर्पण करावी. यामुळे काल सर्प दोषामुळे होणाऱ्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?