Navratri 2022: नवरात्रीसह सुरू होतोय नवीन आठवडा, ‘या’ पाच राशींचे नशीब बदलणार!

उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरवात होत आहे. नवरात्रीची सुरवात नवीन आठवड्यापासून होत असल्याने हा आठवडा काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.

Navratri 2022: नवरात्रीसह सुरू होतोय नवीन आठवडा, 'या' पाच राशींचे नशीब बदलणार!
नवरात्र २०२२
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 25, 2022 | 6:01 PM

मुंबई, उद्यापासून शारदीय नवरात्रीला (Navrati 2022) सुरवात होणार आहे. सप्टेंबरचा नवा आठवडा उद्यापासून सुरू होणार आहे. नवीन आठवडा 26 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत असेल. या आठवड्याची सुरवातच नवरात्रीपासून होत असल्याने याचे विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीत माता दुर्गेच्या (Mata Durga) नऊ रूपांची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. या आठवड्यात वृषभ, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीत धन, संपत्ती लाभाचे योग आहेत. नवीन आठवडा तुमच्या राशीसाठी कसा जाणार आहे हे जाणून घेऊया.

  1. मेष- आठवड्याची सुरुवात खूप चांगली आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मनोरंजन आणि आनंदाच्या कामात व्यस्त राहाल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घयन्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही सहलीला जाऊ शकता. सोमवार या आठवड्यातील सर्वोत्तम दिवस असेल.
  2. वृषभ- आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होईल. कामकाजाच्या परिस्थितीत  सुधारणा होईल. करिअरमधील समस्याही या आठवड्यात दूर होतील. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वाद टाळावे. या आठवड्यात बुधवार तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवस असेल.
  3. मिथुन- या आठवड्यात देवीची तुमच्यावर कृपा राहील. जुन्या आजारात सुधारणा होईल. नवीन ओळखीने धनार्जनाचे मार्ग खुले होतील. या आठवड्यातही पैसा आणि करिअरची स्थिती चांगली राहील. शक्यतो पूजेसाठी थोडा वेळ द्या. या आठवड्यात शुक्रवार तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवस असेल.
  4. कर्क- आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. धन आणि नात्यातले अडथळे दूर होतील.  आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गती येईल. या आठवड्यात वैवाहिक जीवनात विशेष लाभ होऊ शकतो. या आठवड्यात सोमवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
  5. सिंह- आठवड्याची सुरुवात चांगली आहे. करिअर आणि आरोग्य स्थिती सुधारेल. पैसा तर येईलच पण खर्चही वाढतील. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्या. या आठवड्यात गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
  6. कन्या- सप्ताहाच्या सुरुवातीला रखडलेली कामे पूर्ण होतील. पैशाची स्थिती ठीक राहील, पण काम वाढेल. मालमत्तेशी संबंधित लाभ मिळण्याची चांगली शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो. या आठवड्यात मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
  7. तूळ- आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य बिघडू शकते. धावपळ आणि मेहनत खूप करावी लागेल. एकूणच करिअर आणि पैशाची परिस्थिती ठीक राहील.  या आठवड्यात तुम्ही तुमच्या मोठ्यांच्या सल्ल्याचे पालन करा. गुरुवार हा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल असेल.
  8. वृश्चिक- सप्ताहाच्या सुरुवातीला करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाची रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक सहकार्य आणि पैशाची स्थिती चांगली राहील. या आठवड्यात प्रॉपर्टीच्या कामात व्यस्तता राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात शुक्रवार तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  9. धनु- आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, चांगली माहिती मिळेल. पैशाची स्थिती चांगली राहील, करिअरमध्ये मान-सन्मान वाढेल. तब्येतीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात बुधवार तुमच्यासाठी विशेष अनुकूल असेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें