Navratri 2022: नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा नवग्रह शांती पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत

| Updated on: Sep 21, 2022 | 11:16 AM

यंदाच्या शारदीय नवरात्रीत देवीसोबतच नऊ ग्रहांचीदेखील पूजा करा. यामुळे देवीच्या कृपेसोबतच ग्रहांचे पाठबळ देखील मिळेल. कोणत्या दिवशी कोणत्या ग्रहाची पूजा करावी जाणून घ्या.

Navratri 2022: नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा नवग्रह शांती पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत
नवरात्र २०२२
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  शारदीय नवरात्र (Navratri 2022) सोमवार 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. असे मानले जाते की, देवी दुर्गेचे (Devi Durga) प्रत्येक रूप मानवांसाठी जीवनदात्यासारखे आहे. नवग्रहांमध्ये देवी दुर्गा वास करतात असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये माता दुर्गेची पूजा-अर्चा करण्यासोबतच नवग्रहांचीही शांती (Nav graha shanti) पूजा करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत ग्रह अनुकूल नसल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नवरात्रीत नवग्रहांची शांती पूजा केल्याने नवग्रहांच्या दुष्प्रभावापासून मुक्ती मिळते. यासोबतच नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. जाणून घ्या नवरात्रीमध्ये नवग्रहांची पूजा कशी केली जाते आणि कोणत्या दिवशी कोणत्या ग्रहाची पूजा करावी.

 

अशी करा पूजा

  1. पहिला दिवस- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला मंगळ शांतीची पूजा केली जाते. स्कंदमातेच्या रूपात मंगळाच्या शांतीची पूजा करण्याचा नियम आहे.
  2. दुसरा दिवस- नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने राहू ग्रहाला शांती मिळते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. तिसरा दिवस- नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी शांतीसाठी बृहस्पतिची पूजा केली जाते. या दिवशी महागौरीच्या रूपाची पूजा केल्याने गुरु ग्रहाला शांती मिळते.
  5. चौथा दिवस- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शनिदेवाच्या शांतीसाठी कालरात्रीच्या रूपाची पूजा करण्याचा नियम आहे.
  6. पाचवा दिवस- नवरात्रीच्या पाचव्या दिवशी बुध ग्रहाच्या शांतीसाठी कात्यायनी मातेच्या रूपाची पूजा केली जाते.
  7. सहावा दिवस- शुक्र ग्रहाच्या शांतीसाठी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कुष्मांडाच्या रूपाची पूजा केली जाते. यामुळे केतू ग्रहाला शांती मिळते.
  8. सातवा दिवस- नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता दुर्गेचे सातवे रूप माता सिद्धिदात्रीची पूजा करण्याचा नियम आहे. यामुळे शुक्र ग्रहाला शांती मिळते.
  9. आठवा दिवस- सूर्य ग्रहाच्या शांतीसाठी नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.
  10. नववा दिवस- नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी चंद्रघंटा मातेच्या रूपाची पूजा केली जाते. यामुळे चंद्र ग्रहाला शांती मिळते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)