Navratri 2022: वेश्यालयातल्या मातीने का बनवली जाते दुर्गेची मूर्ती? अद्भुत आहे कारण

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचे महत्त्व असते. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. जाणून घेऊया वेश्यालयातील मातीपासून दुर्गा देवीची मूर्ती का तयार केली जाते?

Navratri 2022: वेश्यालयातल्या मातीने का बनवली जाते दुर्गेची मूर्ती? अद्भुत आहे कारण
दुर्गा मूर्ती
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 21, 2022 | 11:19 AM

Navratri 2022: नवरात्रीचा पवित्र सण उत्तर भारतात आणि ईशान्य भागात साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस मनोभावे देवीची पूजा केली जाते. दुर्गा देवीच्या स्थापनेपूर्वी तिची मूर्ती (Durga Murti) तयार केली जाते. आपल्यापैकी अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, दुर्गा देवीची मूर्ती बनविण्याकरिता वेश्यालयाची (soil of Red light area) माती वापरली जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचे महत्त्व असते. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. जाणून घेऊया वेश्यालयातील मातीपासून दुर्गा देवीची मूर्ती का तयार केली जाते?

कशी सुरु झाली परंपरा

या परंपरेमागे असे कारण दिले जाते की,  वेश्यागृहात पाउल टाकणारी महिला असो वा पुरुष आत जाण्यापूर्वी सर्व पवित्रता आणि चांगुलपणा बाहेरच सोडतो त्यामुळे वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र बनते. त्यामुळे ही पवित्र माती देवीची मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते. दुसरी कथा अशीही सांगतात की एक वेश्या दुर्गेची निस्सीम भक्त होती. तिचा समाजाकडून तिरस्कार केला जात होता. एक ऋषींच्या स्वप्नात देवीने दर्शन देऊन तिची मूर्ती बनविण्यासाठी वेश्यालयातील मातीचा वापर करायला सांगितले. असे करून देवीने त्या वेश्येची भक्ती स्वीकार केली.

अन्य काही जणांच्या मते वेश्याव्यवसाय हा वाईट मानला जातो. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना समाजाने वाळीत टाकलेलं असतं. मात्र अनेक जण या दलदलीत काही समाज कंटकांकडून ढकलले जातात.  वेश्या हा समाजाचाच एक भाग आहे, आणि दुर्गा पूजा निमित्ताने त्यांना मानाची वागणूक मिळावी हा यामागचा उद्देश आहे.  वेश्याव्यवसाय चुकीचा असला तरी अनेक जण नाईलाजाने या व्यवसायात असतात. नवरात्रीच्या निमित्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें