Navratri 2022: काशीच्या कुस्तीपटूंना देखील हलवता आली नाही ‘ही’ दुर्गेची मूर्ती, 255 वर्षांपासून विना विसर्जन साजरा होतोय नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव संपल्यानंतर प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते. परंतु या मूर्तीबद्दल वेगळाच अनुभव स्थानिकांना आला. त्यामुळे या मूर्तीचे  255 वर्षांनंतरही विसर्जन झालेले नाही. देवीच्या मूर्तीबाबत आलेला अनुभव अत्यंत चमत्कारिक होता. 

Navratri 2022: काशीच्या कुस्तीपटूंना देखील हलवता आली नाही 'ही' दुर्गेची मूर्ती, 255 वर्षांपासून विना विसर्जन साजरा होतोय नवरात्रोत्सव
नवरात्री
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 21, 2022 | 11:20 AM

Navratri 2022:  जुन्या काळी अनेक कुटुंब बंगालमधून काशीला  आली आणि तिथेच स्थायिक झाली. सुमारे तीन शतकांपूर्वी बंगालमधील हुगळीहून काशी येथे वास्तव्यासाठी आलेल्या प्रसन्न मुखर्जी नावाच्या एका गृहस्थाने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेची मदनपुरा (Madanpura Durga devi) येथील गुरुनेश्वर महादेव मंदिराजवळ देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. नवरात्रोत्सव संपल्यानंतर प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते. परंतु या मूर्तीबद्दल वेगळाच अनुभव स्थानिकांना आला. त्यामुळे या मूर्तीचे  255 वर्षांनंतरही विसर्जन झालेले नाही. देवीच्या मूर्तीबाबत आलेला अनुभव अत्यंत चमत्कारिक होता.

काय होता अनुभव?

नवरात्रोत्सव संपल्यानंतर जेव्हा मूर्ती विसर्जन करण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हललीसुद्धा नाही. त्यानंतर मूर्तीला उचण्यासाठी काशीच्या पहेलवानांना बोलाविण्यात आले होते. तेही एक दोन नव्हे तर तब्बल साठ! पण त्यांना देखील ही मूर्ती उचलता आली नाही. त्यानंतर या मूर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा होतो.

1767 मध्ये काशीमध्ये स्थापन झालेल्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन आजतागायत झाले नाही कारण ती मूर्ती तिच्या जागेवरून उचलली जाऊ शकली नाही. विसर्जनाच्या वेळी मुर्ती हलवण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र ती हलू शकली नाही. आज काशीमध्ये ही  देवी भक्तांसाठी श्रद्धास्थान बनली आहे.

देवीने दिले होते स्वप्नात दर्शन

नातेवाईक सांगतात की, रात्री देवीने प्रसन्न मुखर्जी यांना स्वप्नात दर्शन देत विसर्जन न करण्याची इच्छा सांगितली.  तेव्हापासून ही  देवी त्याच जागी स्थिर आहे. दर वर्षी नवरात्रात या मूर्तीची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीनिमित्त पेंढा, बांबू, सुतळी आणि मातीपासून बनवलेल्या या दुर्गेच्या मूर्तीची विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रात या ठिकाण चंडीपाठाचा कार्यक्रम नवरात्रभर सुरू असतो. यावेळीही सप्तमी, अष्टमी आणि नवमीला विशेष पूजा देखील करण्यात येते.  मुखर्जी कुटुंबाच्या वतीने मंदिराची सजावट करण्यात येत आहे. दुर्गा मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाली पद्धतीने बनवलेल्या मूर्तीप्रमाणेच तिचे रूप आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें