संध्याकाळच्या वेळी सुई-धाग्यासह ‘या’ गोष्टी कोणालाही देऊ नयेत; वाईट अनुभव येऊ शकतात

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी काही विशिष्ट वस्तू ज्या कधीही कोणाला दान करू नयेत किंवा कोणालाही उधार देऊ नयेत. त्यामुळे जीवनात आर्थिक समस्या व समृद्धीची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यासाठी त्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या का कोणाला देणे टाळावे हे जाणून घ्या.

संध्याकाळच्या वेळी सुई-धाग्यासह या गोष्टी कोणालाही देऊ नयेत; वाईट अनुभव येऊ शकतात
संध्याकाळच्या वेळी सुई-धाग्यासह 'या' गोष्टी कोणालाही देऊ नयेत; वाईट अनुभव येऊ शकतात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 4:37 PM

वास्तुशास्त्रात जसं घरातील दिशा किंवा काही वास्तू नियमांबद्दल सांगितले जाते. तसेच काही वस्तूंबद्दलही सांगितले गेले आहे ज्या संध्याकाळी कधीही कोणाला दान करू नये किंवा कोणाला देऊ नये. जरी कोणी त्या मागितल्या तरीही त्या देणं आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. मान्यतेनुसार, संध्याकाळी या वस्तू एखाद्याला दिल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टी ज्या बाहेरच्यांनी किंवा शेजाऱ्यांनी मागितल्या तर अजिबात देऊ नये.

मीठ, दही आणि साखर

वास्तु तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी किंवा सूर्योदयानंतर दही, मीठ किंवा साखर यासारख्या कोणत्याही पांढऱ्या वस्तूंचे दान करू नये किंवा कोणाला त्या देऊ नयेत. संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो, ज्यामुळे तुमच्या घरात आणि जीवनात सुख-समृद्धीचा अभाव निर्माण होतो. शिवाय, मीठ दान केल्याने जीवनात इतर समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे कधीही कोणाला सायंकाळी मीठ, साखर , दही या वस्तू देऊ नयेत.

संध्याकाळी हळद कोणाला देऊ नये

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी हळद दान करणे टाळावे. किंवा कोणी मागितले तरी देऊ नये. हळद दान केल्याने कुंडलीतील गुरूच्या स्थानावर नकारात्मक परिणाम होतो. कमकुवत गुरूमुळे सुख आणि समृद्धीचे नुकसान देखील होऊ शकते. संध्याकाळी हळद दिल्याने केल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात.

तुळशीचे रोप दान करणे

तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे आणि ते आपल्या सनातन धर्मातही तितकेच विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात तुळशीमातेची पूजा केली जाते. म्हणून संध्याकाळी तुळशीचे रोप दान करणे निषिद्ध आहे. वास्तु तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी तुळशीचे रोप दान करणे टाळावे. या चुकीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

सुई-धागा देणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी सुया दान करणे किंवा कोणाला देणे चांगले मानले जात नाही. जरी कोणी तुमच्याकडे सुई-धागा मागण्यासाठी आले तरी तुम्ही त्यांना ते देणे टाळावे. ही छोटीशी चूक तुमच्या जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम करू शकते आणि अनेक समस्या निर्माण करू शकते.

सायंकाळी पैसे देणे

वास्तु तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी कधीही कोणालाही पैसे दान करू नये किंवा उधार देऊ नये. संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण करणे देखील तितकेच अशुभ मानले जाते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी देवी लक्ष्मी तुमच्या घरी येते आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे दान केले किंवा उधार दिले तर ते अशुभ मानले जाते. या चुकीमुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)