
वास्तुशास्त्रात झाडू केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही तर सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे. झाडू घरातील घाण काढून टाकतो आणि नकारात्मकता दूर करतो, ज्यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. पण आपण जेव्हा नवीन झाडू आणतो तेव्हा आणल्या आणल्या तो वापरण्याच्या आधी काही गोष्टी नक्की करा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
शुभ मुहूर्तावर झाडू आणा.
वास्तुशास्त्रानुसार, नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शुभ काळ निवडा. कोणत्याही गुरुवार आणि शुक्रवारी तुम्ही झाडू खरेदी केलात तर नक्कीच ते शुभ ठरते. झाडू खरेदी केल्यानंतर तो नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवा. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह होण्यास मदत होते.
झाडूची पूजा करा.
घरी नवीन झाडू आणल्यानंतर, देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा करा. तो स्वच्छ पाण्याच्या कापडाने हलकाच पुसून घ्या आणि हळद आणि कुंकू, तांदूळ वाहून त्याची पूजा करा. असे केल्याने घरात धन आणि समृद्धी वाढते. पूजा केल्यानंतर, झाडू योग्य ठिकाणी ठेवा.
झाडूची योग्य जागा
वास्तुशास्त्रानुसार, झाडू नेहमी नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला ठेवा. तो स्वयंपाकघरात किंवा पूजा कक्षात ठेवू नका, कारण तो अशुभ मानला जातो. झाडू नेहमी लपवून ठेवा, जेणेकरून तो कोणालाही दिसणार नाही. तो उलटा ठेवणे टाळा, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. योग्य दिशेने ठेवलेला झाडू समृद्धी आणतो.
झाडू कसा वापरायचा?
वास्तुशास्त्रानुसार रात्री घरात झाडू मारण्यास मनाई आहे कारण तो देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. सकाळी आणि दुपारी घर स्वच्छ करा. झाडू मारताना घरातील घाण बाहेर काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते.
जुना झाडू कसा काढायचा
जुना झाडू फेकून देताना तो कचऱ्याच्या डब्यात टाकू नका, तर तो एका निर्जन ठिकाणी ठेवा किंवा दान करा. शनिवारी जुना झाडू काढून टाकणे शुभ मानले जाते. नवीन झाडू आणण्यापूर्वी जुना झाडू काढून टाका, जेणेकरून घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं म्हटलं जातं.
या चुका करू नका
वास्तुशास्त्रानुसार, झाडूवर पाऊल ठेवणे, तो अस्वच्छ ठेवणे किंवा तुटलेला झाडू वापरणे अशुभ मानले जाते. झाडू कधीही उभा ठेवू नका, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नका, कारण त्यामुळे गोंधळ आणि अस्थिरता वाढते. नेहमी स्वच्छ आणि मजबूत झाडू निवडा.
समृद्धीचे प्रतीक
वास्तुशास्त्रानुसार, झाडू केवळ घर स्वच्छ ठेवत नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती देखील आकर्षित करतो. नवीन झाडू आणल्यानंतर या वास्तु टिप्सचे पालन करा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. झाडूचा योग्य वेळी, योग्य दिशेने आणि आदराने वापर केल्याने घर आनंद, शांत आणि समृद्धीने भरलेलं राहिलं.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)