Numerology Pick Your Colour for Holi 2022 | आता अंकशास्त्रानुसार खेळा होळी, जाणून घ्या कोणता रंगाने होळी खेळणं ठरणार तुमच्यासाठी लकी

| Updated on: Mar 17, 2022 | 1:16 PM

आज सर्वककडे 17 मार्चला गुरुवारी होलिका (Holika) दहन , दुसऱ्या दिवशी 18 मार्चला शुक्रवारी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे.

Numerology Pick Your Colour for Holi 2022 | आता अंकशास्त्रानुसार खेळा होळी, जाणून घ्या कोणता रंगाने होळी खेळणं ठरणार तुमच्यासाठी लकी
numbrology
Follow us on

मुंबई : आज सर्वककडे 17 मार्चला गुरुवारी होलिका (Holika) दहन , दुसऱ्या दिवशी 18 मार्चला शुक्रवारी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला ( paurnima) सूर्यास्तानंतर पौर्णिमा 17 मार्च 2022 रोजी दुपारी 01:29 पासून सुरू होईल आणि 18 मार्च 12:52 पर्यंत राहील. पण भद्रकाल 17 मार्च रोजी 01:20 पासून सुरू होईल आणि रात्री 12:57 पर्यंत राहील. होलिका दहन वेळ संशयात राहते. शास्त्रात भद्रकाल हा अशुभ काळ सांगितला असून या काळात कोणतेही शुभ कार्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या दिवशी रंगाच्या उत्सवात नात्यांना बहर आणावा, अशी आपली संस्कृती सांगते. भारतात होळीचा सण मोठा धुमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी आबाल वृद्ध रंगात न्हावून निघतात. प्रत्येक रंगाचं त्याचं-त्याचं एक ठराविक वैशिष्ट्य आहे. होळीच्या रंगाचं फक्त एकमेकांना लावण्यापुरतंच महत्त्व नाहीये, तर त्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे.

जन्मदिवस 1,10,19,28
आपल्यासाठी शुभ रंग लाल आहे. यावर्षी तुम्ही जर लाल रंगाने होळी खेळली तर ती तुमच्यासाठी ही होळी शुभ असेल. हा रंग वापरल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. एक अंक असलेल्यांवर भगवान सूर्यनारायणाची कृपा राहील.

जन्मदिवस 2,11,20,29
आपल्यासाठी शुभ रंग पांढरा आहे. पांढरा रंग आनंद, शीतलतेचे प्रतीक आहे. चंद्र ग्रह आपले मन शांत ठेवतो. यावर्षी आपण हिरव्या रंगाने होळी खेळल्यास तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढेल. राग शांत होईल.

जन्मदिवस 3, 12, 21, 30
आपल्यासाठी पिवळा रंग शुभ आहे. आपण या रंगाने होळी खेळल्यास आपल्या जीवनात सकारात्मकता येईल. विशेषत: मुलांनी या रंगाने खेळणं चांगलं राहिल.

जन्मदिवस 4,13, 22, 31
जर आपण निळ्या रंगात होळी खेळणार असाल तर ही होळी आपल्यासाठी खूप शुभ असेल. या रंगाचा कपाळावर टिळा लावल्याने तुमच्या कामात वृद्धी होईल.

जन्मदिवस 5,14,23
हिरवा रंग आपल्यासाठी सर्वात शुभ आहे. हिरव्या रंगासह आपण होळी खेळलात तर नात्यातील कडवटपणा दूर होईल. गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला रंग आहे.

जन्मदिवस 6, 15 24
या तारखेला जन्मलेल्यांसाठी शुभ रंग पांढरा आणि गुलाबी आहे. या रंगांनी होळी खेळल्यास कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. नवीन जोडप्यांनी गुलाबी रंगाने होळी खेळावी. जेणेकरुन त्यांच्या आयुष्यात प्रेम राहील.

जन्मदिवस 7, 16, 25
तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात पण तुम्ही कोणतंही काम नेटाने पूर्ण करता. यंदाची होळी खेळण्यासाठी तुम्ही केशरी रंगाचा वापर करा. नारंगी रंग लाल आणि पिवळा मिसळून तयार होतो. या रंगाचा टिळा कपाळावर लावल्याने आपले सर्व त्रास दूर होतील.

जन्मदिवस 8,17, 26
शनि पवित्रता आणि न्यायाचे प्रतीक आहे. 8 अंक असलेल्यांसाठी निळा रंग चांगला आहे. आपण या रंगाने होळी खेळल्यास घरात समृद्धी येईल. जीवनातील अडचणी दूर होतील. हा रंग श्वसन रोगांपासून मुक्त होण्यासाठी फायदेशीर आहे.

जन्मदिवस 9,18, 27
तुमच्यासाठी शुभ रंग लाल आहे. या होळीला तुम्ही लाल रंगाने जरुर होळी खेळा. लाल रंग हा उत्स्फूर्ततेचा आणि आनंदाचं प्रतिक मानला जातो.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते कठीण काळात 5 गोष्टी देतील साथ, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

Holi 2022 | राशीनुसार रंगांनी खेळा होळी, जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे दान केल्यास होईल शुभ

17 March 2022 Panchang: 17 मार्च 2022, होळीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ