Holi 2022 | राशीनुसार रंगांनी खेळा होळी, जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे दान केल्यास होईल शुभ

Holi 2022 | राशीनुसार रंगांनी खेळा होळी, जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे दान केल्यास होईल शुभ
holi 2022

तुम्हाला माहित आहे का तुम्ही राशीनुसार रंग खेळू शकता. त्याच प्रमाणे राशीनुसार दान केल्याने तुम्हाला फायदा सु्द्धा होईल.

मृणाल पाटील

|

Mar 17, 2022 | 7:30 AM

मुंबई : होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात (India) याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. हिंदू धर्मात होळी ( Holi 2022) या सणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी होळी 18 मार्चला आहे. दुसरीकडे 17 मार्चला होलिका दहन होणार आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी लोक विधिपूर्वक पूजा करतात. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. प्रत्येक कामात यश मिळते. होलिका दहनाचा दिवस छोटी होळी म्हणूनही ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी तुम्ही अनेक प्रकारचे उपाय करू शकता . पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही राशीनुसार रंग खेळू शकता. त्याच प्रमाणे राशीनुसार दान केल्याने तुम्हाला फायदा सु्द्धा होईल.

मेष
या राशींच्या लोकांनी लाल मसूर बडीशेप आणि जव या मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करा. या दिवशी तुम्ही गडद लाल रंगाने होळी खेळू शकता.

वृषभ
या राशींच्या व्यक्तींनी गुरूशी संबंधित वस्तू दान करा. त्यात चणा डाळ, हळद आणि मध असते. या दिवशी तुम्ही पांढऱ्या आणि मलई रंगांनी होळी खेळू शकता.

मिथुन
मोहरीचे तेल किंवा काळी मसूर यासारख्या शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. या राशीच्या लोकांसाठी हिरव्या रंगाची होळी खेळणे शुभ राहील.

कर्क
चहाची पाने आणि लोखंडासारख्या शनिशी संबंधित गोष्टींचे दान करा. होळी खेळण्यासाठी पांढरा किंवा लाल रंग वापरा.

सिंह
गुरूशी संबंधित वस्तूंचे दान करा, त्यात गाईचे तूप किंवा केशर इ. होळी खेळण्यासाठी तुम्ही केशरी किंवा लाल रंग वापरू शकता.

कन्या
कन्या राशीच्या राशीच्या लोकांनी या दिवशी मंगळाचे उपाय करावेत. या दिवशी खंड, केसर, बतासे या वस्तूंचे दान करावे. होळी खेळण्यासाठी तुम्ही हिरवा रंग वापरू शकता.

तूळ
तांदूळ, बोर किंवा पनीर या शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तू दान करा. होळी खेळण्यासाठी तुम्ही पांढरा पिवळा रंग वापरू शकता.

वृश्चिक
बुध ग्रहाशी संबंधित वस्तू दान करू शकता. त्यात कापूर किंवा हिरव्या मिरच्यांचा समावेश होतो. या दिवशी लाल रंगाने होळी खेळणे या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.

धनु
धनु राशीच्या लोकांनी चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान करावे. यामध्ये दूध, तांदूळ किंवा पांढरी मिठाई समावेश करा . या राशीचे लोक या दिवशी पिवळ्या रंगाने होळी खेळू शकतात.

मकर
सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. यामध्ये गहू किंवा गूळ यांचा समावेश होतो. होळी खेळण्याचा शुभ रंग निळा आहे.

कुंभ
बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे, ज्यात मूग किंवा हिरव्या फळांचा समावेश आहे. होळी खेळण्याचा शुभ रंग निळा आहे.

मीन

शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तू जसे की दही, तांदूळ किंवा साखर इत्यादींचे दान करावे. होळी खेळण्याचा शुभ रंग पिवळा आहे.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

Chanakya Niti | ‘सावधान’ हे 4 संकेत मिळाले की समजून जा वाईट काळ जवळ आला आहे, वेळीच सावध व्हा !

16 March 2022 Panchang : 16 मार्च 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें