AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tuljabhavani Mata | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक, पहिल्या माळेची सांगता

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. शारदीय नवरत्रौत्सवाची पहिली माळ देवीची आरती झाल्यानंतर साखरेचा गोड भात दाखवून आरती करण्यात आली. देवीच्या चांदीच्या पादुका राजहंस या वाहनामध्ये ठेऊन आणि देवीची चांदीची मूर्ती वाहनांमध्ये बसवून मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली त्यानंतर पहिल्या माळेची सांगता झाली.

Tuljabhavani Mata | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक, पहिल्या माळेची सांगता
Tuljabhavani - Chhabina Mirvnuk
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:16 AM
Share

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या (Tuljabhavani Mata Mandir) मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. शारदीय नवरत्रौत्सवाची (Shardiya Navratri 2021) पहिली माळ देवीची आरती झाल्यानंतर साखरेचा गोड भात दाखवून आरती करण्यात आली. देवीच्या चांदीच्या पादुका राजहंस या वाहनामध्ये ठेऊन आणि देवीची चांदीची मूर्ती वाहनांमध्ये बसवून मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली त्यानंतर पहिल्या माळेची सांगता झाली.

छबिना मिरवणूक

छबिना मिरवणूक

दररोज 15 हजार भक्तांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

दररोज 15 हजार भक्तांना तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. 15 हजारपैकी 7 हजार पास हे ऑनलाईन तर 8 हजार पास हे ऑफलाईन मिळणार आहेत. तुळजाभवानी दर्शनासाठी दररोज तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाला नियोजनाची कसरत करावी लागणार आहे.

परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.

तुळजाभवानी मंदीरात 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षाखालील बालके यांना प्रवेश नसणार नाही याबाबत मंदिर व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात तसेच मास्क, सॅनिटायझर वापरावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.

कोजागिरी पौर्णिमा रद्द

नवरात्र उत्सवातील कोजागिरी पौर्णिमा रद्द करण्यात आली आहे तर या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात जिल्हा बंदी तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे या 3 दिवसात एकही भाविकाना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमे दिवशी आणि पोर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करुन तिथे पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

असा असणार नऊ दिवसांचा कार्यक्रम

  • 9 ऑक्टोबर रोजी रथअलंकार महापूजा
  • 10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
  • 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा
  • 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा
  • 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
  • 14 ऑक्टोबर रोजी घटोत्थापन

15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा संकटं वाढू शकतात

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.