AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari 2022 : आषाढी वारीसाठी पंढरी सजली, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार रविवारी महापुजा

आषाढी वारी दिवशी नामदेव पायरीला अतिशय महत्व आहे. आषाढी दिवशी पहाटे चंद्रभागेचे स्नान करुन वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नामदेव पायरीला मनमोहन फुलांची आरास करण्यात येतेय.

Pandharpur Wari 2022 : आषाढी वारीसाठी पंढरी सजली, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार रविवारी महापुजा
आषाढी वारीसाठी पंढरी सजलीImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 8:07 PM
Share

पंढरपूर : उद्या, रविवारी आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपूर सजलं आहे. आळंदी आणि देहूहून वारकरी पंढरपुरात दाखल व्हायला लागले आहेत. नामदेव पायरीबरोबरच ते आता आपल्या विठुरायाचं दर्शनही घेणार आहेत. चंद्रभागेत स्नान करून दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. आज चंद्रभागेत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. एनडीआरएफचं पथक वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत केलं जाणार आहे. पुण्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईनंतर आता पुण्यातही सेना फुटली आहे. मुख्यमंत्री संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर पंढरपूर जाताना हडपसरमध्ये (Hadapsar) मुख्यमंत्र्याचे जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील हजारो शिवनसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना समर्थन देणार आहेत.

बाल मंदिरात बालचमुंचा दिंडी

सांगली शहरातील जिजामाता बाल मंदिरात बालचमुंचा दिंडी सोहळा साकारण्यात आलाय. विठुरायाच्या जयघोष करत अवघी पंढरी यानिमित्त अवतरली. शालेय जीवनातच बालमनावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना सणांची ओळख व्हावी, देव देवतांबाबत प्रेम-भक्तिभाव निर्माण व्हावा या स्तुत्य हेतूने सांगलीच्या जिजामाता बालमंदिरात बालचमुंच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी आषाढी एकादशी असल्याने विद्यामंदिराच्या प्रमुख लताताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये विठ्ठल-रुख्माईसह वारकरी वेशातील मुले व मुलींनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. यामुळे डॉ. देशपांडे बालमंदिरात जणू अवघी अवतरली पंढरी असं भक्तिमय वातावरण पसरले होते.

कडधान्यातून विठू माऊली साकारली

विरार येथे आषाढी एकादशी निमिताने कडधान्यांचा वापर करून चक्क विठू माऊली साकारली आहे. विरारच्या भाताने येथील चित्रकार कौशिक जाधव याने अवघ्या 20 मिनिटांत ही कलाकृती बनविली आहे. या कालाकृतीसाठी तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वटाने, चणे, या कडधान्यांचा वापर केला आहे. या कडधान्यांना तांत्रिक उपकरणातून आणि पेन पट्टी पेन्सिलच्या साह्याने कलर ही भरून विठूमाऊली साकारली आहे. दरम्यान, आषाढी वारी दिवशी नामदेव पायरीला अतिशय महत्व आहे. आषाढी दिवशी पहाटे चंद्रभागेचे स्नान करुन वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नामदेव पायरीला मनमोहन फुलांची आरास करण्यात येतेय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.