Pandharpur wari 2022: तुकोबारायांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न; आज सोलापूर जिल्ह्यात केला प्रवेश

| Updated on: Jul 05, 2022 | 10:08 AM

इंदापूर, आज सकाळी पुणे जिल्ह्यातील शेवटचा इंदापूर तालुक्यातील सराटी या गावातील मुक्काम आटोपल्यानंतर निरा नदीत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या (Tukaram maharaj palkhi 2022) पादुकांना निरा स्नान घालण्यात आले. अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखीस भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान राज्यात पावसाने सर्वत्र हजेरी […]

Pandharpur wari 2022: तुकोबारायांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न; आज सोलापूर जिल्ह्यात केला प्रवेश
Follow us on
इंदापूर, आज सकाळी पुणे जिल्ह्यातील शेवटचा इंदापूर तालुक्यातील सराटी या गावातील मुक्काम आटोपल्यानंतर निरा नदीत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या (Tukaram maharaj palkhi 2022) पादुकांना निरा स्नान घालण्यात आले. अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखीस भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान राज्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे त्यामुळे वारकरी पावसात चिंब भिजत हरिनामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या (Pandharpur wari 2022) दिशेने मार्गस्थ होत आहे. वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याला आता विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. मजल दर मजल करीत तुकोबांची पालखी 9 जुलैला पंढरपूर नगरीत प्रवेश करेल. पंढरपुरात प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सोयी वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आटोपल्यानंतर आणखी काही स्थळं आहेत ज्याला वारकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी. ती स्थळं कोणती आहेत या बद्द्दल जाणून घेऊया.

पुंडलिक मंदिर

भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मदिरामध्ये मोठा सभामंडप असुन आतिल बाजूस गाभारा आहे. गाभर्‍यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावुन पुजा केली जाते.तसेच पहाटेपासुन रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार,काकड आरती, महापूजा, महानेवैद्य,धुपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणीमोठा उत्सव असतो. चंद्रभागानदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेऊन तिथे पुजा व नित्योपचार केले जातात.

लोहदंड तीर्थ

लोहदंड तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिकाच्या मंदिरासमोर आहे. विशेष म्हणजे इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने इंद्राच्या अंगावरील सहस्त्र छिद्रे गेली आणि इंद्राच्या हातातील लोहदंड या तीर्थात तरंगला अशी आख्यायिका आहे.

लखुबाई मंदिर

दगडी पुलाजवळ दिंडीरवनात हे मंदिर आहे. भगवान श्रीकॄष्ण जेंव्हा द्वारकेहून श्रीरुक्मिणीला शोधण्यास दिंडीरवनात आले तेंव्हा त्यांची आणि रुक्मिणीची भेट या वनात झाली.रुक्मिणी देवीचे तप करण्याचे स्थान हेच लखुबाईचे मंदिर होय.पुर्वी या मंदिराभोवती पुष्कळ झाडी होती.  हे मंदिर पुर्णपणे दगडी बांधकाम केलेले असुन हेमाडपंथी पद्धतीचे आहे या मंदिरात दसरा आणि नवरात्र हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

हे सुद्धा वाचा

नामदेव पायरी

अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, ” हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या”. असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, ” हे नामा,तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल.” नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली. ही घटना शके 1238 आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या 14 जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.