AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Dosh : घरात घडणाऱ्या या घटना देतात पितृदोषाचे स्पष्ट संकेत, लगेच व्हा सावध!

पितृदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला अनेक प्रकारे त्याचे संकेत मिळतात. पितृदोषाची (Pitru Dosh) लक्षणे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत.

Pitru Dosh : घरात घडणाऱ्या या घटना देतात पितृदोषाचे स्पष्ट संकेत, लगेच व्हा सावध!
पितृदोषImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 06, 2023 | 9:42 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षाचे 15 दिवस पितरांना समर्पित असतात. पितृ पक्ष हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान करण्याचा विशेष काळ आहे. एवढेच नाही तर पितृ दोष दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितृ पक्षाचा काळही उत्तम मानला जातो. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे, जो 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे. पितृदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला अनेक प्रकारे त्याचे संकेत मिळतात. पितृदोषाची (Pitru Dosh) लक्षणे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत. तुमच्या घरात किंवा जीवनात अशा घटना घडत असतील तर सावध राहून पितृदोष टाळण्यासाठी उपाययोजना करा. चला जाणून घेऊया पितृ दोषाची लक्षणे

अशा घटना पितृ दोषाची लक्षणे आहेत

  • पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकटे येतात. याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागतात.
  • जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण तणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल, तर त्यामागचे एक कारण पितृदोष असू शकते. अशा स्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत.
  • कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण असू शकते.
  • पिंपळाच्या झाडात त्रिदेव वास करतात, पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे. अनेकदा पिपळाचे झाड स्वतःहून घरांमध्ये उगवते. जर तुमच्या घरात पीपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पितरांच्या नाराजीचे लक्षण असू शकते, पण ते तोडून न टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते माती सोबत बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे.
  • घरामध्ये अचानक तुळस सुकणे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करा. तसेच दानधर्म करा, देवपूजा करा.
  • घरातील रोजची भांडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांची नाराजी घरातील सुख-शांती हिरावून घेते. नात्यात अंतर आणते.
  • याशिवाय विवाहयोग्य मुला-मुलीचे लग्न न होणे, संततीचे सुख न मिळणे, संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत पितृदोषापासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर