AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या या दिवशी करतात सोन्याची खरेदी, काय आहे धार्मिक कारण?

या दिवशी देवी लक्ष्मीच्या गजस्वरूपाची पूजा केली जाते. या रूपात देवी लक्ष्मी हत्तीच्या आसनावर विराजमान आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या या दिवशी करतात सोन्याची खरेदी, काय आहे धार्मिक कारण?
सोन्याची खरेदी Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 16, 2022 | 2:12 PM
Share

पंचांगानुसार, पितृ पक्ष (Pitru Paksha) दरवर्षी भाद्रपद पौर्णिमा तिथीपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला संपतो. या दरम्यान पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध कर्म (Shradha Karma), पिंडदान आणि तर्पण केले जाते. या 16 दिवसांत कोणत्याही प्रकारचे शुभ तसेच मंगल कार्य  करण्यास मनाई आहे. या काळात सोने-चांदी किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे, पण श्राद्ध पक्षात असा दिवस येतो की त्या दिवशी सोने-चांदी आणि इतर वस्तू खरेदी केल्याने धनत्रयोदशीसारखेच शुभ असते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गजलक्ष्मी व्रत (Gajalakshami vrat) पाळले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या गजस्वरूपाची पूजा केली जाते. या रूपात देवी लक्ष्मी हत्तीच्या आसनावर विराजमान आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी  लक्ष्मीची पूजा करून आणि मंत्रजप केल्याने आशीर्वाद मिळतो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचा मुहूर्त जाणून घेऊया.

गजलक्ष्मी व्रत 2022 मुहूर्त

पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी शनिवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 02.14 वाजता सुरू होत असून रविवार 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4.32 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या तिथीनुसार 18 सप्टेंबर रोजी गजलक्ष्मी व्रत आहे. लक्ष्मी ही सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवी मानली जाते. गजलक्ष्मी व्रतात लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदी केल्याने ते आठपट अधिक वाढते अशी धार्मिक मान्यता आहे.

सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त

गजलक्ष्मी व्रताच्या दिवशी सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त- सकाळी 09.11 ते दुपारी 12.15 पर्यंत.

संध्याकाळी, शुभ मुहूर्तावर संध्याकाळी 6.23 ते 09.19 या वेळेत खरेदी करणे शुभ राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.