AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी करा सोपा उपाय, पितृदोषापासून होईल मुक्ती

Pitru Paksha 2023 यावेळी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवर भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपला आशीर्वाद देतात.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी करा सोपा उपाय, पितृदोषापासून होईल मुक्ती
पितृपक्षImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 26, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षाच्या काळाला विशेष महत्त्व आहे. 15 दिवसांचा हा विशेष कालावधी पितरांना समर्पित आहे. पितृपक्षात (Pitru Paksha 2023) पितरांसाठी स्नान, दान, तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात. पितृ पक्षादरम्यान, पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. पितरांचे भक्तीभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते. यावेळी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवर भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपला आशीर्वाद देतात. पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृ पक्षाचा काळही उत्तम आहे. अशा वेळी काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

पितृ पक्षात हे काम करा

  • पितृ पक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो. पितृ पक्षादरम्यान, श्राद्ध विधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते करावे. यामुळे पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देतात.
  • पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता. हे देखील पूर्ण परिणाम देते.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल, तर पितृ पक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्या. याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला चोला अर्पण करा. प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा.
  • पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका. तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका. त्यांना यथाशक्ती दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं