आपले पूर्वज किती हुशार होते ते पहा.. हे आहे एका छोट्या लिंबाचे मोठे रहस्य..

Astro Tips : नवीन वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात अगोदर त्याच्या टायरखाली लिंबू ठेवण्याची प्रथा बघायला मिळतं. मात्र, यामागील नेमके कारण काय? हे जाणून घ्या.

आपले पूर्वज किती हुशार होते ते पहा.. हे आहे एका छोट्या लिंबाचे मोठे रहस्य..
Lemons under tires
| Updated on: Oct 30, 2025 | 8:16 AM

नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर हिरव्या मिरची आणि लिंबू बांधले जाते. मग गाडी असो वा नवीन घर. कोणाचीही वाईट नजर लागू नये, याकरिता लिंबूसह हिरव्या मिरच्या बांधल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसार नव्या वस्तूची पूजा करून त्यावर हिरवी मिरची आणि लिंबू बांधण्याचा सल्ला दिला जातो. वाईट नजरेपासून लिंबू आणि मिरची वाचवतात, असे सांगितले जाते. हेच नाही तर नवीन वाहनाच्या टायरखाली लिंबू देखील ठेवले जाते. त्यामागे नेमके कारण काय हे जाणून घेऊयात. ज्योतिशशास्त्रात याला मोठे महत्व आहे. प्रसिद्ध ज्योतिशशास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिषशास्त्रात, लिंबू शुक्र आणि चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.

लिंबूचा आंबटपणा शुक्र ग्रहाशी संबंधित

लिंबूचा आंबटपणा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि त्याचा रस चंद्राचे प्रतीक असल्याचे मानले जाते. मुळात म्हणजे ज्योतिषशास्त्रात लिंबाला अत्यंत जास्त महत्व आहे. लिंबू नकारात्मकता खूप प्रभावीपणे दूर ठेवतो. ज्यावेळी आपण नवीन वस्तू खरेदी करतो, त्यावेळी खूप जास्त त्याच्यासोबत नकारात्मक ऊर्जा येते. मग अशावेळी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्ही सर्व नवीन वस्तूंजवळ लिंबू ठेवायला हवे. त्यामुळे नकारात्मक गोष्टी दूर राहण्यास मदत होईल.

नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास होते मोठी मदत 

जेव्हा नवीन वाहनाच्या टायरखाली लिंबू ठेवले जाते, त्यावेळी नवीन प्रवासाला सुरूवात करण्याच्या अगोदर वाईट नजर दूर राहण्यास यामुळे मदत होते. दुष्परिणामांपासून संरक्षण मिळण्यास मोठी मदत होते आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्यापासून दूर राहते. यामुळे बऱ्याचदा बघितले असेल की, शोरूममधून गाडी बाहेर काढतानाच अनेक लोक टायरखाली लिंबू ठेवतात.

लिंबू टायरखाली ठेवतात कारण हे…

लिंबू टायरखाली ठेवल्याने आपल्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास मदत होते. बरेच लोक घरात कोणतीही नवीन वस्तू घेतली तरीही लिंबू त्या वस्तूच्या आसपास ठेवतात, हे आपण यापूर्वी बघितले असले. गाडीला लिंबू देखील लावले जाते, याचे कारण हेच की, वाईट नजरेपासून सुरक्षित राहता यावे आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर रहावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)