
प्रयागराज येथे उद्यापासून महाकुंभाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षातील हा पहिला महाकुंभ असणार आहे. त्यानंतर पुन्हा 12 वर्षानंतर महाकुंभ येईल. कुंभ म्हणजे समरसतेचा उत्सव आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठं लोक पर्व आहे. आस्थेची त्रिवेणी आहे. संवादाचा मोठा मंच आहे. अध्यात्मिक ऊर्जेचं मोठं केंद्र आहे. अध्यात्माचा एवढा मोठा उरुस भारतात दुसरा भरत नाही. त्यामुळेच या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असतं. देशातीलच नव्हे तर विदेशातूनही लोक महाकुंभ पाहायला येतात. काही तर केवळ महाकुंभ पाहण्यासाठी येतात. पण जात नाहीत. कारण वैराग्य आल्याने तेही साधू बनतात. संसाराचा त्याग करतात. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी मास कम्युनिकेशनचं काम महाकुंभमधून होत असतं. त्याग, तप, हठ, योगाला सांभाळणारे निर्मोही संत पूर्वी प्रजा आणि राजाला सल्ला द्यायचे. राज्यसत्तेने आपल्या मस्तीत राहू नये आणि समाजाने स्वार्थ पाहू नये, असा सल्ला या संत महंतांकडून दिला जायचा. तसेच कोणत्या गोष्टींची चिंता करण्याची गरज आहे, हेही...