Rahu Ketu Gochar 2025: होळीनंतर राहू-केतु ‘या’ राशींवर भारी पडेल, आरोग्यासह आर्थिक नुकसान होऊ शकते…!

Rahu Ketu Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू हे अशुभ परिणाम देणारे ग्रह मानले जातात. होळीनंतर, राहू आणि केतू गोचर करणार आहेत. नक्षत्रांच्या या बदलामुळे अनेक राशींना आर्थिक समस्या होऊ शकतात.

Rahu Ketu Gochar 2025: होळीनंतर राहू-केतु या राशींवर भारी पडेल, आरोग्यासह आर्थिक नुकसान होऊ शकते...!
| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 3:37 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. जेव्हा सर्व ग्रह एका विशिष्ट वेळेमध्ये त्यांचे राशी चिन्ह आणि नक्षत्र बदलतात तेव्हा तुमच्या आयुषयात काही विशेष गोष्टी घडतात. काही राशीच्या लोकांना या ग्रहांच्या गोचराचा सकारात्मक परिणाम होतो तर काहीना त्याचा नकारात्मक परिणाम होतो. होळीनंतर पाप ग्रह म्हणून ओळखले जाणारे राहू आणि केतू त्यांचे नक्षत्र बदलणार आहेत. या काळामध्ये काही राशींना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. राहू आणि केतू कुंडलीत प्रवेश केल्यावर अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते.

अशा परिस्थितीमध्ये या राशीचेय लोकांना प्रामुख्याने आर्थिक आणि आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींनी काळजी घेतली पाहिजेल. कॅलेंडरनुसार, यावर्षी होळीचा सण 14 मार्च रोजी साजरा केला जाईल. तर होळीनंतर दोन दिवसांनी, म्हणजे 16 मार्च रोजी, राहू आणि केतू नक्षत्र बदलतील. तुमच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू सक्रिय झाले असतील तर तुम्ही काही विशेष उपाय करू शकता.

मेष राशी – राहू आणि केतूच्या नक्षत्रांमध्ये बदल झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या काळात या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुमचा राग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर या काळात तुमचे कोणतेही जुने आजार उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक वेदना सहन कराव्या लागू शकतात.

कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांसाठी नक्षत्रातील हा बदल खूप कठीण असू शकतो. या काळात या राशीच्या लोकांना कामात किंवा नोकरीत अडचणी येऊ शकतात. या काळात, तुमची नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते. याशिवाय, पदोन्नती आणि वेतनवाढीत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मानसिक अशांतता देखील अनुभवता येते.

मीन राशी – राहू आणि केतू नक्षत्र बदलू शकतात आणि मीन राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण करू शकतात. या काळात तुम्ही आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवसायात नफ्याची पातळी मंद राहील. तुमच्या कामाच्या ठिकाणी एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. प्रवास करताना आणि गाडी चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.