12 दिवसानंतर राहूचे राशी परिवर्तन! ‘या’ 3 राशींचे नशीब उजळणार; धनलाभासह होणार प्रगती
Rahu Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार, राहू लवकरच कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, मात्र 3 राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. या राशींना आर्थिक लाभासह करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू नेहमी वक्री म्हणजेच उलट्या दिशेने भ्रमण करतो. येत्या 5 डिसेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी राहू कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही शनीची रास असून राहू आणि शनी यांच्यात मैत्रीचे संबंध असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. त्यामुळे या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. काही राशींसाठी हा बदल शुभ ठरू शकतो, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या गोचरामुळे तीन राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
सिंह रास
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे मकर राशीतील गोचर लाभदायी ठरू शकते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामे सहज मार्गी लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी मोठी डील मिळू शकते किंवा चांगला नफा होऊ शकतो. या काळात आर्थिक परिस्थितीही मजबूत राहण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीसाठी राहूचे हे गोचर सकारात्मक ठरू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल मानला जात आहे. त्यामुळे विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. व्यवसायातील नफा वाढवण्यासाठी आखलेल्या योजना आणि रणनीती यशस्वी होण्याचे संकेत आहेत.
मीन रास
मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे मकर राशीतील संक्रमण अनुकूल ठरू शकते. आईसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि कौटुंबिक वातावरणही चांगले राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मोठ्या त्रासापासून दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. तसेच, व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत.
राहूच्या गोचरादरम्यान कोणता उपाय करावा?
राहूचे मकर राशीत गोचर होत असताना देवी दुर्गेची विधिवत पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दुर्गा मातेची आराधना केल्याने राहूच्या प्रतिकूल प्रभावापासून संरक्षण मिळण्यास मदत होते, असे सांगितले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)