संध्याकाळी किंवा रात्री भावाला राखी बांधणे शुभ असते की अशुभ? शास्त्र काय सांगतं?

वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पहाटे 5.47 पासून ते दुपारी 1.24 पर्यंतचाच होता. पण काही कारणास्तव तेव्हा शक्य झालं नाही तर मग त्या वेळेनंतर म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते की अशुभ, शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात.

संध्याकाळी किंवा रात्री भावाला राखी बांधणे शुभ असते की अशुभ? शास्त्र काय सांगतं?
Raksha Bandhan 2025, Is it Auspicious to Tie Rakhi at Night
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 3:27 PM

रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. पण काही वेळेला वेळेआभावी किंवा दूर राहत असल्याने सकाळी राखी बांधणे शक्य होत नाही.बहुतेक बहिणी सकाळी किंवा दुपारी राखी बांधतात, परंतु जर काही कारणास्तव दिवसा ते शक्य नसेल तर रात्री राखी बांधणे योग्य आहे का? याबद्दल शास्त्र नक्की काय सांगतं हे जाणून घेऊयात.

शास्त्रानुसार, संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर भावाला राखी बांधता येते?

वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पहाटे 5.47 पासून ते दुपारी 1.24 पर्यंतचाच होता. मग त्या वेळेनंतर भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते का? तर नाही. शास्त्रानुसार, संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर कधीही भावाच्या मनगटावर राखी बांधता येते.त्यात काहीही अशुभ नसते.

रात्री भावाला राखी बांधणे शुभ आहे की अशुभ?

2025 मध्ये आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी भद्राची सावली नाही. अशा परिस्थितीत राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. रात्री राखी बांधण्याबाबत, शास्त्रांमध्ये यासाठी कोणताही स्पष्ट निषेध नाही. तुम्ही रात्री देखील राखी बांधू शकता, परंतु लक्षात ठेवा की त्या वेळी भाद्रा काळ नाही आणि कोणताही अशुभ काळ चालू नाही याची खात्री करून घ्यावी लागते पण आज ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी सूर्योदयानंतर भद्रा काळ किंवा कोणताही अशुभ काळ सुरु नाही, म्हणून तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री देखील तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता.

रक्षाबंधनाला हे काम करा

या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग्य योग असे शुभ संयोग जुळून येत आहेत. अशा परिस्थितीत भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासोबतच दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा पूजा-पाठ, जप-तप आणि दान करा. हे आजच्या दिवशी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तर, दुसरीकडे, या दिवशी गरजूंना मदत करणे, त्यांना अन्न किंवा कपडे देणे आणि प्राणी-पक्ष्यांना खायला घालणे यामुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो. तसेच, रात्री चंद्राची पूजा केल्याने चंद्र दोषापासून मुक्तता मिळते आणि मानसिक शांती मिळते असं म्हटलं जातं.