Rangbhari Ekadashi 2021 : आज ‘रंगभरी एकादशी’, आजच्या दिवशी देवी पार्वती सासरी आल्या होत्या, काशीमध्ये होळी सुरु

| Updated on: Mar 25, 2021 | 12:50 PM

आज रंगभरी एकादशी (Rangbhari Ekadashi) आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.

Rangbhari Ekadashi 2021 : आज रंगभरी एकादशी, आजच्या दिवशी देवी पार्वती सासरी आल्या होत्या, काशीमध्ये होळी सुरु
Rangbhari Ekadashi 2021
Follow us on

मुंबई : आज रंगभरी एकादशी (Rangbhari Ekadashi) आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. दर वर्षी रंगभरी एकादशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला येते. या एकादशीला अमालकी एकादशी म्हणतात. आजच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आजच्या दिवशी काशीला सजवलं जातं (Rangbhari Ekadashi 2021 Know The Shubh Muhurt And Importance Of Mahadev And Parvati Puja).

मान्यतेनुसार आजच्या दिवशी पहिल्यांदा भगवान महादेव माता पार्वतीला काशी घेऊन आले होते. त्यामुळे ही एकादशी बाबा विश्ननाथच्या भाविकांसाठी विशेष असते. आजपासून काशीमध्ये होळीचा सण सुरु होतो जो पुढील सहा दिवस चालेल.

पूजेचा शुभ मुहूर्त

? रंगभरी एकादशी तिथीची सुरुवात – 24 मार्चला 10 वाजून 23 मिनिटांपासून

? रंगभरी एकादशी समाप्त – 25 मार्चला 9 वाजून 47 मिनिटापर्यंत

? व्रत पारणाची वेळ – 26 मार्चला सकाळी 6 वाजून 18 मिनिट ते 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत असेल

पूजेची विधी

सकाळी उठून स्नान करुन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. पूजेत अबिर, गुलाल, चंदन आणि बेलपत्र अर्पित करा. सर्वातआधी भगवान शिवला चंदन लावा आणि त्यानंतर बेलपत्र आणि जल अर्पित करा. यानंतर गुलाल आणि अबिर अर्पित करा.

देवी पार्वती सासरी येते

आजच्या दिवशी बाबा विश्वनाथच्या मंदिराला नवरदेवाप्रमाणे सजवलं जातं. त्यानंतर आनंद आणि उत्साहात देवी पार्वतीचा गौणा केला जातो. मान्यता आहे की आजच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीला घेऊन काशीला आले होते. त्यानंतर शिवभक्तांनी गुलाल आणि अबिर खेळून आनंदोत्सव साजरा करतात.

रंगभरी एकादशीचं महत्त्व

रंगभरी एकदशीला अमालकी एकादशीही म्हणतात. या दिवशी विधी विधानीने पूजा केल्याने भगवान शिव आणि विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे.

Rangbhari Ekadashi 2021 Know The Shubh Muhurt And Importance Of Mahadev And Parvati Puja

संबंधित बातम्या :

Amalaki Ekadashi 2021: एकादशी तिथी आजपासून, पण उपवास उद्या ठेवावा, जाणून घ्या यामागील कारण…

Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…

HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास…