Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…

देशभरात होळीचा (Holi) सण 29 मार्चला मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल (Barsana Lathmar Holi). पण मथुरा येथे होळीचा सण एका आठवड्यापूर्वीच सुरु होतो.

Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या...
Barsana Lathmar Holi

मुंबई : देशभरात होळीचा (Holi) सण 29 मार्चला मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल (Barsana Lathmar Holi). पण मथुरा येथे होळीचा सण एका आठवड्यापूर्वीच सुरु होतो. याची सुरुवात फाल्गुन महिन्याच्या अष्टमी तिथीला लड्डू होळीने होते. त्यानंतर लठमार होळी (Lathmar Holi) साजरी केली जाते. दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या नवमी तिथीला बरसानामध्ये लठमार होळी खेळली जाते. जगभरात बरसाना येथील लठमार होळी प्रसिद्ध आहे. देशातीलच नाही तर जगातील लोक या होळीला पाहाण्यासाठी येतात. आज लठमार होळी आहे. कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या (Mathura Barsana Lathmar Holi 2021 Know The History And Everything About It).

बरसानामध्ये राधारानीचा जन्म झाला होता. राधा भगवान श्रीकृष्ण यांची प्रेमिका होती. मान्यता आहे की एकदा श्रीकृष्ण राधारानीसोबत होळी खेळण्यासाठी आपल्या ग्वालांसोबत बरसाना येथे पोहोचले. त्यांनी राधारानी आणि गोपीकांना त्रास दिला. यानंतर राधारानी आणि गोपिकांनी मिळून काठ्यांनी कृष्ण आणि ग्वालांना पळवलं. तेव्हापासून बरसाना येथे लठमार होळीची परंपरा सुरु झाली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात बरसाना येथे होळीचं आयोजन केलं जातं.

सकाळपासून तयारीला सुरुवात

लठमार होळीच्या दिवशी सकाळपासूनच याची तयारी सुरु होऊन जाते. जस जसा दिवस वाढतो तसे नंदगांवचे लोक बरसाना येथे पोहोचतात. गाण गात, गुलाल उडवून एकमेकांसोबत मस्ती करतात. यानंतर येथील महिला नंदगांवच्या पुरुषांना काठ्यांनी मारतात आणि ते ढाल घेऊन आपला बचाव करतात. होळी खेळणाऱ्या पुरुषांना होरियारे आणि महिलांना हुरियारि म्हटलं जातं.

महिला सशक्तिकरणचं उदाहरण

लठमार होळी जगभरातील महिला सशक्तिकरणाचं उदाहरणही आहे. काठ्यांच्या माध्यमातून महिला आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात आणि पुरुष त्याचं सहर्ष स्वीकार करतात. लठमार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते (Mathura Barsana Lathmar Holi 2021 Know The History And Everything About It)

23 मार्च ते 31 मार्च पर्यंतचा मथुराच्या होळीचं आयोजन

23 मार्च 2021 – रंगीली गल्लीत लठमार होळी, बरसाना

24 मार्च 2021 – लठमार होळी, नंदगांव

25 मार्च 2021 – लठमार, रंग होळी, गाव रावल

25 मार्च 2021 – श्रीकृष्ण जन्मस्थानची सांस्कृतिक, फुलांची होळी

25 मार्च 2021 – श्री द्वारकाधीश मंदिर होळी, मथुरा

26 मार्च 2021 – छडीमार होळी, गोकुल

28 मार्च 2021 – होलिका दहन

28 मार्च 2021 – फालैनमध्ये जळत्या होळीतून पंडा निघतील

28 मार्च 2021 – श्रीद्वारकाधीश मंदिरापासून होळी डोलाचं नगर भ्रमण

29 मार्च 2021 – श्रीद्वारकाधीश मंदिरमध्ये टेसू फूल, अबीर गुलाल होळी

29 मार्च 2021 – संपूर्ण जनपद मथुरामध्ये अबीर-गुलाल, रंग होळी

30 मार्च 2021 – दाऊजी का हुरंगा, बलदेव

30 मार्च 2021 – हुरंगा, जाव

30 मार्च 2021 – हुरंगा, नंदगांव

30 मार्च 2021 – गाव मुखराईमध्ये चरकुला नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम

31 मार्च 2021 – हुरंगा, गांव बठैन

Mathura Barsana Lathmar Holi 2021 Know The History And Everything About It

संबंधित बातम्या :

Holashtak 2021 | होलाष्टकादरम्यान चुकूनही करु नका ‘ही’ कामं…

Holashtak 2021 : होलाष्टकमध्ये शुभ कार्य का केलं जात नाही? जाणून घ्या यामागील कारण…

HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास…