Holashtak 2021 : होलाष्टकमध्ये शुभ कार्य का केलं जात नाही? जाणून घ्या यामागील कारण…

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात (Good Things Should Not Do During Holashtaka).

Holashtak 2021 : होलाष्टकमध्ये शुभ कार्य का केलं जात नाही? जाणून घ्या यामागील कारण...

मुंबई : हिंदू पंचांगानुसार होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या (Good Things Should Not Do During Holashtaka) उत्साहात साजरा केला जातो. पोर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. यावर्षी 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल तर 29 मार्चला सकाळी धुलिवंदन असेल (Why Good Things Should Not Do During Holashtaka Know The Reason Behind It).

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. यावेळी होलाष्टक 22 मार्च म्हणजेच आजपासून सुरु होईल आणि 28 मार्चपर्यंत राहील. यानंतर 28 मार्च 2021 ला होलिका दहन आणि 29 मार्च 2021 ला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान शुभ कार्य करणे अशुभ मानलं जातं. असं यासाठी कारण अष्टमी तिथीला कामदेवाने भगवान शिवची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भगवान शिव यांनी कामदेवाला भस्म केलं होतं. कामदेवला प्रेमाचा देवता मानलं जातं त्यामुळे त्यांच्या मृत्यूने तिन्ही लोकात शोक पसरला. त्यानंतर कामदेवची पत्नी रतीने भगवान शिव यांच्याकडे क्षमा मागीतली होती आणि शिवने कामदेव यांना पुन्हा जीवित करण्याचं आश्वासन दिलं होतं.

होलाष्टकसंबंधीची आख्यायिका

असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने त्याचा आठ दिवस अनन्वित छळ केला. परंतु, भगवान विष्णूची भक्त प्रल्हादवर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादची आत्या होलिका ही तिच्या मांडीवर प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्याचं ठरलं.

होलिकेला अग्नी देवाने न जळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिका त्या अग्नीत जळून भस्मसात झाली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ मानली जाते (Holashtak and Holi 2021).

‘होलाष्टक’

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. या वेळी होलाष्टक 22 मार्च म्हणजेच आजपासून सुरु होईल आणि 28 मार्चपर्यंत राहील. हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान नवीन घरात प्रवेश, लग्न, दाढी करणे, मुंडण करणे इत्यादी शुभ क्रिया करण्यास मनाई आहे.

होलाष्टक दरम्यान ही कामं करु नये –

1. होलाष्टक दरम्यान लग्न, भूमीपूजन, गृह प्रवेश, मंगलकार्य, नवा व्यवसाय आणि नवीन काम करु नये.

2. त्याशिवाय, कुठल्याही प्रकारचं यज्ञ, हवन करु नये. या दिवसांमध्ये नवविवाहितेने तिच्या माहेरी जाऊ नये.

3. शास्त्रांनुसार होलाष्टक दरम्यान 16 संस्कार, जसे विवाह संस्कार, मुंडण संस्कार, नामकरण संस्कार सारखी कार्यही करु नये.

Why Good Things Should Not Do During Holashtaka Know The Reason Behind It

संबंधित बातम्या :

Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती

HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास…