
मुंबई : रावण हा अत्यंत पराक्रमी योद्धा होता. तिन्ही जगाचा स्वामी बनण्याची त्याची महत्त्वकांक्षा होती, ज्यासाठी त्याला केवळ सैन्यच नाही तर पुत्र देखील इच्छित शक्तींनी सुसज्ज हवा होता. त्यासाठी त्याने सर्व ग्रह नक्षत्रांची स्थिती बदलली. त्यामुळे त्रिलोकात एकच काहूर माजला. त्याच्या शक्ती आणि पराक्रमासमोर बहुतेक ग्रहांनी पराभव स्वीकारला. पुत्र मेघनादच्या जन्मावेळी रावणाने (Ravan Shani Story) सर्व ग्रहांना पुत्राच्या अकराव्या घरात वास करण्याची सूचना केली होती, परंतु शनिने तसे करण्यास नकार दिला आणि तो बाराव्या घरात स्थिर राहिला. शनिदेवाच्या या वागण्यामुळे रावणाने त्यांना बंदी करून तुरुंगात टाकले. यामुळे इंद्र स्वतः घाबरले. त्यांनी त्रिदेवांना संरक्षणाची विनंती केली.
सर्व नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाची चाल सर्वात मंद आहे. शनि त्याच्या संथ हालचालीमुळे अडीच वर्षे (30 महिने) एका राशीत राहतो. पौराणिक कथेनुसार शनिदेवाच्या संथ गतीचे कारण दशानन रावण आहे. असे म्हणतात की रावणाने रागाच्या भरात शनिदेवाचा पाय मोडला होता आणि तेव्हापासून शनीची गती मंदावली. रावण अतिशय अहंकारी आणि विद्वान होता. त्याच्या सामर्थ्याच्या जोरावर कोणाचाही पराभव करण्याची ताकद त्याच्यात असायची. रावणालाही शास्त्रांची चांगली जाण होती. रावणाला आपला मुलगा आपल्यासारखाच बलवान आणि सर्वशक्तिमान हवा होता. जेव्हा रावणाचा मुलगा मंदोदरीच्या पोटात वाढला तेव्हा तिने आपल्या भावी मुलाला अशा नक्षत्रांमध्ये जन्म द्यावा की तो पराक्रमी आणि दीर्घायुष्य होईल अशी योजना आखली. रावणापासून जन्मलेला हा मुलगा मेघनादच होता.
या योजनेनंतर रावणाने सर्व ग्रह आपल्या ताब्यात घेतले आणि सर्व ग्रहांना शुभ आणि उत्तम स्थितीत राहण्याचा आदेश दिला. रावणाच्या शक्ती आणि अहंकाराने घाबरून सर्व ग्रहांनी त्याचे पालन केले. पण रावणाच्या उद्दामपणासमोर शनिदेव कुठे सहज नतमस्तक होणार होते. रावणाला माहित होते की शनिदेव न्यायदेवता आहेत आणि त्यांना पटवल्याशिवाय आपल्या मुलाला दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकणार नाही.
तेव्हा रावणाने आपल्या शक्तीचा वापर करून शनीला वश केले होते. कारण शनि न्यायाची देवता आहे. त्यामुळे रावणाने काही काळ त्याला नियंत्रित केले, पण मेघनादाच्या जन्माची वेळ येताच शनि मागे गेला. शनीच्या उलट हालचालीमुळे मेघनाद अल्पायुषी झाला. हा शनीचा कोप होता, ज्यामुळे मेघनाद लहान वयातच युद्धात मारला गेला.
जेव्हा रावणाला शनि प्रतिगामी असल्याचे कळले तेव्हा त्याला राग आला आणि त्याने तलवारीने शनीच्या पायावर वार केले. त्या दिवसापासून शनिची चाल संथ झाली.
पौराणिक कथेनुसार रावणाने शनिदेवाला आपल्या शक्तीने वश केले होते. ते शनिला आपल्या सिंहासनाजवळ पायाखाली ठेवत असे. काही काळानंतर त्यांनी शनीला तुरुंगात टाकले. जेव्हा हनुमान श्रीरामाचा संदेश घेऊन माता सीतेकडे गेले आणि लंका जाळली तेव्हा त्यांनी शनिदेवाला आपल्या खांद्यावर बसवले आणि रावणाच्या बंदिवासातून मुक्त केले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)