AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावणाचा भाऊ कुंभकर्ण सहा महिने का झोपायचा? रंजक आहे यामागची कथा

एका वरदानामुळे कुंभकरण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा राहायचा. पण कुंभकरणला सहा महिने झोपेचे वरदान कोणत्या कारणाने मिळाले?

रावणाचा भाऊ कुंभकर्ण सहा महिने का झोपायचा? रंजक आहे यामागची कथा
कुंभकरणImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 14, 2023 | 11:10 PM
Share

मुंबई : रामायणातील मुख्य पात्रांपैकी एक, कुंभकरण हा लंकेचा राजा रावणाचा धाकटा भाऊ होता. कुंभकर्ण हा त्याचा भाऊ रावणसारखाच तपस्वी होता. कुंभकर्णाने (Kumbhakaran Sleep) कठोर तपश्चर्या करून अनेक वरदान मिळवले होते. एका वरदानामुळे कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा राहायचा. पण कुंभकर्णाला सहा महिने झोपेचे वरदान कोणत्या कारणाने मिळाले हे फार कमी लोकांना माहिती आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपला यामागे अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत, त्यापैकी दोन मुख्य कथा आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

पहिली कथा

पौराणिक कथेनुसार, कुंभकर्ण हा त्याचा भाऊ रावण आणि विभीषण यांच्यासारखाच कठोर तपस्वी होता. एकदा रावण आपला भाऊ विभीषण आणि कुंभकर्ण यांच्यासोबत तपश्चर्या करत होता. तिघांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. तेव्हा रावण आणि विभीषण यांनी वरदान मागितले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिले.

यानंतर ब्रह्मदेव कुंभकर्णाजवळ पोहोचले. पण कुंभकर्ण पाहून ब्रह्मदेव काळजीत पडले. खरे तर कुंभकर्ण इतका इतका जेवायचा की ते पाहून ब्रह्मदेवही काळजीत पडले. तेव्हा ब्रह्मदेवांनी कुंभकर्णाची दिशाभूल केली, त्यामुळे कुंभकर्णाने सहा महिने झोपेचे वरदान मागितले आणि ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन वरदान दिले.

दुसरी कथा

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, भगवान इंद्र कुंभकर्णाचा खूप हेवा करत होते कारण कुंभकर्ण ब्रह्मदेवाकडून इंद्रासन मागू शकतो अशी भीती त्यांना वाटत होती. अशा स्थितीत कुंभकर्ण ब्रह्मदेवांकडे वरदान मागत असताना इंद्रदेवांनी कुंभकर्णाचा भ्रमनिरास केला. त्यामुळे कुंभकर्णाने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितल्याचे सांगितले जाते. यामुळे कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागायचा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.