AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phalgun Amavasya 2025 : फाल्गुन आमावस्येच्या दिवशी ‘या’ ठिकाणी दिवे लावल्यामुळे पितृदोषापासून मिळेल मुक्ती

Phalgun Amavasya Deep Pujan : अमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी येतो. या दिवशी, भक्त त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान आणि तर्पण करतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या गोष्टी केल्याने तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तसेच, पितृदोषाच्या समस्येपासून आराम मिळतो. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काही ठिकाणी दिवे लावण्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होतो.

Phalgun Amavasya 2025 : फाल्गुन आमावस्येच्या दिवशी 'या' ठिकाणी दिवे लावल्यामुळे पितृदोषापासून मिळेल मुक्ती
| Edited By: | Updated on: Feb 23, 2025 | 2:00 PM
Share

हिंदू धर्मानुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करत नाही. पंचांगानुसार, 2025ची फाल्गुन आमावस्या 27 फेब्रुवारी रोजी येणार आहे. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक आणि पूर्वजन भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशिर्वाद मिळतात. धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन आमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांच्या समोर पूजा केल्यास आणि त्यांच्या समोर दिवा लावल्यामुळे त्यांचा तुम्हाला आशिर्वाद मिळतो. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान केले पहिजेल. यामुळे तमच्या आयुष्यामधील अडथळे कमी होतात आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच या दिवशी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते.

फाल्गुन आमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील पापांचा नाश होतो आमि तुमच्या जीवनात आनंद आणि सैभाग्य प्राप्त होते. सनातन धर्मग्रंथानुसार, फाल्गुन आमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावणे शुभ मानले जाते. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी काही विशेष ठिकाणी दिवे लावल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सकारात्मक होतात. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते. तसेच या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात ईनंद नांदते. आमावस्येच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते चला जाणून घेऊया.

वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन अमावस्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजपासून 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:14 वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत फाल्गुन अमावस्या 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी फाल्गुन अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याच्या जवळ दिवा लावा. तसेच जीवनात आनंद आणि शांतीची कामना करा. असे मानले जाते की या उपायाचा केल्याने आर्थिक समस्यांपासून लवकरच मुक्तता मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी खऱ्या मनाने पितृसूक्ताचे पठण करा. याशिवाय, फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर, पितरांना आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. तसेच दिवे दान करा. असे मानले जाते की दिवे दान केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही. तसेच, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर देशी तुपाचा दिवा लावा. जर देशी तूपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवावी की दिवा लावल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नका. हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि घरातील सदस्यांमध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...