Vastu Tips : घरातून लगेच हटवा या 5 वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर
जर तुमच्या देखील घरात या पाच वस्तू असतील तर लगेच फेकून द्या. अन्यथा घरात या वस्तूमुळे येते नकारात्मकता. कोणत्या आहेत त्या वस्तू? जाणून घ्या सविस्तर

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा तेथील वातावरणावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो. अनेकदा घरात पडून असलेल्या खराब, निरुपयोगी किंवा तुटलेल्या वस्तूंमुळे नकळत नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे विनाकारण थकवा, चिडचिड, तणाव आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होतात अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे अशा काही वस्तू वेळेवर घरातून हटवणे किंवा दुरुस्त करणे फायदेशीर मानले जाते. कोणत्या आहेत त्या वस्तू? जाणून घ्या सविस्तर
1. बंद किंवा तुटलेले घड्याळ
वास्तुशास्त्रात घड्याळ हे वेळ आणि जीवनातील प्रगतीचे प्रतीक मानले जाते. घरात बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. अशा घड्याळामुळे घरातील ऊर्जा स्थिर होते, कामांमध्ये विलंब होतो आणि प्रगतीला अडथळे निर्माण होतात अशी धारणा आहे. त्यामुळे बंद घड्याळ त्वरित दुरुस्त करावे किंवा घरातून काढून टाकावे.
2. वाळलेली किंवा सुकलेली झाडे
हिरवीगार झाडे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि घराचे सौंदर्यही वाढवतात. मात्र, कुंड्यांमधील झाडे सुकल्यास किंवा त्यांची पाने वाळल्यास ती नकारात्मकतेचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे सुकलेली पाने किंवा झाडे त्वरित काढून टाकावीत.
3. मुख्य दरवाजामागे ठेवलेले चप्पल
मुख्य प्रवेशद्वार हे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे दरवाजाच्या मागे किंवा प्रवेशद्वाराजवळ चप्पलांचा ढीग लावणे वास्तुदोष मानला जातो. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडतो, घरात तणाव वाढतो आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चप्पल नेहमी शू-रॅकमध्ये व्यवस्थित ठेवावी.
4. जुनी बिले आणि न लागणारी कागदपत्रे
अनेकांच्या घरात जुनी बिले, पावत्या आणि रद्दी कागद महिनोनमहिने साचून राहतात. वास्तुशास्त्रानुसार अशा निरुपयोगी कागदपत्रांमुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. त्यामुळे गरज संपल्यानंतर जुनी बिले आणि रद्दी कागद योग्य पद्धतीने नष्ट करावी.
5. खराब झालेले बल्ब
घरातील एखादा बल्ब खराब झाल्यानंतर तो दीर्घकाळ तसाच ठेवणेही वास्तुनुसार योग्य मानले जात नाही. अंधारामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक तणाव वाढतो आणि आळस व निरुत्साह वाढू शकतो. त्यामुळे खराब झालेला बल्ब त्वरित बदलणे आवश्यक मानले जाते.
(डिस्क्लेमर): वरील माहिती ही वास्तुशास्त्राशी संबंधित पारंपरिक श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहे. याला ठोस वैज्ञानिक आधार असल्याचा दावा केलेला नाही. कोणतेही वास्तु उपाय अवलंबण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरेल.