Ganesh Chaturthi 2026 : विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात ‘हे’ म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण
Ganesh Chaturthi 2026 : . काही लोकांनी त्यांच्या पारंपरिक आणि कौटुंबिक रितीरिवाजानुसार मूर्तीचे विसर्जनही सुरू केलं आहे. अनेकांच्या गणरायाचं विसर्जन झालं आहे. मात्र, गणपतीच्या विसर्जनासोबत गणरायाच्या कानात 'हे' म्हणा... ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Ganesh Chaturthi 2026 : 14 सप्टेंबर रोजी अनेकांच्या घरात गणरायाचं आगमन झालं. तर अनेकांच्या गणपतीचं विसर्जन देखील झालं असेल. पण दहा दिवसांचे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीचं विसर्जन बाकी आहे. तर गणरायाची स्थापना झाल्यापासून आपण अनेक विधी करत असतो. विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाची गोष्ट करायला विसरतो… सांगायचं झालं तर, काही लोकांनी त्यांच्या पारंपरिक आणि कौटुंबिक रितीरिवाजानुसार मूर्तीचं विसर्जनही सुरू केलं आहे. मात्र, गणपतीच्या विसर्जनासोबत तुम्ही हे छोटेसे कृत्य केल्यास तुमच्या अपूर्ण इच्छाही पूर्ण होतील. तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्वात आधी जाणून घ्या.
प्रत्येक गावात आणि शहरात गणेशोत्सव हा एक वेगळ्याच प्रकारचा उत्सव असतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा, नृत्य आणि गाण्यांचा जल्लोष असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या आनंदाने गणेशोत्सवात सहभागी होतात. मात्र, काही ठिकाणी विसर्जन आधीच सुरू झालं आहे.
मात्र, विसर्जनाच्या वेळी तुम्ही काही महत्त्वाचे शब्द गणपतीच्या कानात सांगितल्यास, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ते शब्द नेमके कोणते आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मूर्ती विसर्जनासाठी नेण्यापूर्वी, तुम्ही तुमची इच्छा गणपतीच्या डाव्या कानात सांगा आणि तुमच्या उजव्या हाताने तुमचं तोंड झाका आणि तुमच्या मनात जे आहे ते गणपतीला सांगा.
त्याशिवाय, तुमची इच्छा सांगितल्यानंतर तुम्ही गणरायाच्या कानात सांगा, “हे प्रभू, माझी इच्छा पूर्ण कर, माझ्या सन्मानाचं रक्षण कर, माझे भले होवो हे प्रभू, मला सुख, नोकरीत व घरात धनसंपत्ती आणि सर्वांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद दे.” पंडितांच्या मते, असं म्हटल्याने तुमची इच्छा पूर्ण होतं.
पण विद्वानांच्या मते यामागे एक कारण आहे. त्याचा अर्थ काय? हे देखील जाणून घ्या. विसर्जन म्हणजे भगवान गणेश पृथ्वी सोडून कैलास पर्वतावर पोहोचतात. विसर्जनानंतर, भगवान गणेश थेट कैलास पर्वतावर पोहोचतात आणि आपल्या आई-वडिलांना भेटून त्यांचं आशीर्वाद घेतात. त्यामुळे, असा विश्वास आहे की त्यावेळी तुम्ही व्यक्त केलेलं स्वप्न ते शिव आणि पार्वतीपर्यंत पोहोचवतील. म्हणूनच, असं म्हटलं जातं की विसर्जनाच्या दिवशी, तुम्ही तुमची इच्छा कोणालाही न ऐकता भगवान गणेशाच्या कानात सांगितली पाहिजे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.