AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 दिवसात माफी मागा अन्यथा…. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली, सतीश सालियान मातोश्रीवर जाण्याआधीच…नेमकं काय घडलं?

Disha Salian Case : मातोश्रीवरील मोठ्या गदारोळानंतर अखेर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सतीश सालियन यांच्याकडून बजावलेली 500 कोटींच्या मानहानीची नोटीस स्वीकारली आहे. ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर नेमकं काय घडलं?

7 दिवसात माफी मागा अन्यथा.... आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली, सतीश सालियान मातोश्रीवर जाण्याआधीच...नेमकं काय घडलं?
adtiya thackeray disha salian caseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 19, 2026 | 4:43 PM
Share

सतीश सालियान त्यांच्या वकिलांसह मातोश्रीबाहेर पोहोचले आहेत. यावेळी तिथे शिवसैनिकांचाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आदित्यंच्या लोकांनी मातोश्रीबाहेर येऊ नका अशी धमकी दिल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला. त्यांनी सांगितलं की मातोश्रीवर जाऊन नोटीस देण्याचा निर्णय आपण केवळ धमकी दिली गेल्यामुळेच घेलत्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कला नगरच्या प्रवेश द्वारावर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली, अशीही माहिती त्यांनी दिली.

मातोश्री परिसरात नेमकं काय घडतंय?

सतीश सालियन आणि त्यांचे वकिल निलेश ओझा यांच्यासह मातोश्री कला नगरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी माताश्रीमध्ये जात नोटीस देण्याचा प्रयत्न केला पण कलानगरच्या गेटवरच त्यांना आदित्य ठाकरेंचे वकिल भेटले आणि त्यांनी तिथेच त्यांच्याकडून नोटीस स्वीकारली अशी माहिती दोन्ही बाजूच्या वकिलांनी दिली आहे.

दिशाचे वडील सतीश सालियन नेमकं काय म्हणाले?

माझ्या मुलीची हत्या झाली, तिच्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे ही नोटीस बजावत आहोत. ही नोटीस 500 कोटींची आहे. माझ्या वकिलांना तुम्ही हे प्रकरण कोर्टात नाही चालवू शकणार, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे. ही धमकी आदित्यच्या माणसांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं की मी नोटीस काय आहे ते बघितलं नाही पण रिसिव्हड म्हणून मी नोटीस घेत आहे. त्यानंतर माध्यमांसमोर ठाकरेंच्या वकिलांनी नोटीशीतील काही भाग वाचूनही दाखवला. ज्यामध्ये 500 कोटींच्या मानहानीचा उल्लेख असल्याचे त्यांनीही सांगितलं. दरम्यान, दिशाच्या वडिलांनी यापूर्वीच सांगितलंय की त्यांना सीबीआयच्या तपासावर पूर्ण विश्वास असून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ शेकडो शिवसैनिकांनी मातोश्री येथे गराडा घातलेला पहायला मिळाला. त्यांनी आदित्यवर होणारे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरेंनीही त्यांच्यावरील सालियान प्रकरणात होणारे आरोप हे राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच आदित्य यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपण दिशाला ओळखतही नव्हतो, ना कधी भेटलो होतो, असं म्हटलं आहे. या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...