पितृपक्षात पूर्वजांना स्वप्नात जेवताना पाहणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र काय सांगते?

आता पितृपक्षाचा काळ सुरु आहे. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. पण या काळात पित्र किंवा पूर्वज जेवन करताना, अन्न ग्रहण करताना स्वप्नात दिसले तर त्याचे काय संकेत असतात? त्याचा अर्थ काय असतो हे जाणून घेऊयात. 

पितृपक्षात पूर्वजांना स्वप्नात जेवताना पाहणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र काय सांगते?
Seeing ancestors eating in a dream on Pitru Paksha is good or bad
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2025 | 5:07 PM

आता पितृपक्षाचा काळ सुरु आहे. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार, 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात, पूर्वज त्यांच्या वंशजांच्या घरी जातात आणि त्यांना आशीर्वाद देतात. या काळात श्राद्ध आणि तर्पण करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. तसेच हा महिना म्हणजे पित्रांना अन्न अर्पण केलं जातं. हा सुरु झालेला पितृपक्षाचा काळ 21 सप्टेंबर रोजी संपेल.

पूर्वजांशी संबंधित अनेक प्रकारची स्वप्ने पडतात.

हा काळ पूर्वजांना समर्पित आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना पूर्वजांशी संबंधित अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. कधी कधी या काळात काहींना स्वप्नाद्वारे देखील आपल्या पित्रांचे दर्शन होते. पण त्याचे अनेक अर्थ निघू शकतात. जसं की स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या अनेक स्वप्नांचा अर्थ हा वेगवेगळा असू शकतो किंवा काही संकेत असतात ज्याकडे आपण दूर्लक्ष करतो. काही लोकांना स्वप्नात मृत व्यक्ती रडताना दिसते आणि कधीकधी पूर्वजांना अन्न खाताना देखील दिसतात. पण स्वप्नात पूर्वजांना अन्न खाताना पाहण्याचा अर्थ काय असू शकतो जणून घेऊयात.

पूर्वज स्वप्नात अन्न खाताना दिसले किंवा जेवताना दिसले तर त्याचा अर्थ काय?

पितृपक्षाच्या काळात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते.या दरम्यान अनेकांना अशी स्वप्ने पडणे अगदीच सामान्य आहे. जर पितृपक्षात पूर्वजांना स्वप्नात पाहिले किंवा ते स्वप्नात जेवताना दिसले तर त्याचा अर्थ काय होतो? स्वप्न शास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा अर्थ स्पष्ट केला गेला आहे. स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी दर्शवत असते. जर पितृपक्षात पूर्वज स्वप्नात अन्न खाताना दिसले किंवा जेवताना दिसले तर त्याचा अर्थ स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे हे जाणून घेऊयात.

स्वप्नात पूर्वजांना जेवताना पाहणे कशाचे संकेत असतात?

आशीर्वाद मिळणे: स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमच्या पूर्वजांना अन्न खाताना दिसले तर ते एक शुभ संकेत मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप खूश आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला मोठे यश, मोठ्या कामांमध्ये यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतो.

बिघडलेले काम पूर्ण होईल : पितृपक्षात, जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज अन्न खाताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला सुख, संपत्ती आणि पैसा मिळू शकेल आणि सर्व बिघडलेले काम पूर्ण होतील.

आशीर्वाद मिळणे : जर स्वप्नात पूर्वज अन्न खाताना दिसले तर याचा अर्थ असा की ते तुमच्यावर खूप खूश आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडणार आहेत.

बदल किंवा इच्छा : स्वप्नात पूर्वजांना जेवताना पाहणे हे देखील एक संकेत आहे की त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा आहे. अशा परिस्थितीत पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण करावे.

पूर्वजांच्या आनंदाचे प्रतीक : जर पितृपक्षात तुम्हाला स्वप्नात तुमच्या पूर्वजांना आनंदाने अन्न खाताना दिसले तर याचा अर्थ असा की ते तुमच्यावर खूप खूश आहेत. तुमच्या पूर्वजांना अन्न खाताना पाहून, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे असा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर नेहमीच राहील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)