रामनवमीनिमित्त पाठवा आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना खास संदेश, ज्याच्या मनात राम..

Ram Navami 2024 : आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. लोक सकाळपासूनच एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. हेच नाही तर मंदिरांमध्येही मोठी गर्दी ही बघायला मिळतंय.

रामनवमीनिमित्त पाठवा आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना खास संदेश, ज्याच्या मनात राम..
Ram Navami
| Updated on: Apr 17, 2024 | 12:48 PM

आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. थाटामाटात रामनवमी साजरी केली जातंय. आज ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. आज सकाळपासून राम मंदिरात दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे देखील बघायला मिळत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यंदा रामनवमीला अत्यंत दुर्मिळ योग आहे. अयोध्येमध्ये तर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळतंय. मोठ्या उत्साहात रामनवमी अयोध्येत साजरी केली जातंय. अयोध्येच्या राम मंदिरात भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय.

पूर्वी लोक सणांमध्ये एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी घरी जात, प्रत्यक्षात भेटत. मात्र, सध्या लोकांकडे इतका वेळच राहिला नाहीये. लोक एकमेकांना मोबाईल वरूनच शुभेच्छा देताना दिसत आहेत. रामनवमीनिमित्त जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर खास शुभेच्छांचे संदेश तुमच्यासाठी आहेत.

 


 

ज्याच्या मनात आहे राम,

त्याच्या भाग्यात आहे वैकुण्ठ धाम,

जो रामाच्या पाया पडतो,

त्याचे जीवन होईल कल्याणकारी

———

गुणवान तुम्ही बलवान तुम्ही,

भक्तांना देता तुम्ही वरदान,

भगवान तुम्ही हनुमान तुम्ही,

रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा..

———-

राम ज्याचे नाव, त्याचे आहे अयोध्या धाम,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रामनवमीच्या शुभेच्छा…

 

ज्याने क्रोधावर विजय मिळवला,

लक्ष्मणाचा भाऊ आणि हनुमान लाला त्याच्या चरणी आहे.

ते पुरुषोत्तम राम आहेत, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाला नमस्कार

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

———–

 

श्रीरामाच्या कमळाच्या चरणी मस्तक नतमस्तक करा

जीवनातील प्रत्येक आनंद मिळवा,

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा