
मुंबई : आज शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. असे म्हटले जाते की शनिदेव (Shani upay) हे न्यायाचे देवता आहेत, जे प्रत्येक जीवाला त्यांच्या कर्मानुसार योग्य फळ देतात. धार्मिक विद्वानांच्या मते, ज्याच्यावर ते प्रसन्न होतात, त्याचे भाग्य उजळायला वेळ लागत नाही. दुसरीकडे शनीची अशुभ सावली एखाद्यावर पडली तर त्याचे कोणतेही काम यशस्वी होऊ शकत नाही. शनिदेवाच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आज आम्ही त्या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकूनही करू नये.
ज्योतिषांच्या मते जे लोकं अस्वच्छ राहतात किंवा घाण पसरवतात त्यांना शनिदेवाची कृपा कधीच मिळत नाही. अशा लोकांना नेहमी शनीच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्यांना नेहमी पैशाची तंगी, आजारपण आणि त्रास सहन करावा लागतो.
शनिवार किंवा अमावस्येला मद्यपान करणार्यांना किंवा मांसाहार करणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाहीत. अशा लोकांवर शनीची महादशा वर्चस्व गाजवते. त्यांना प्रत्येक पावलावर अपयशाला सामोरे जावे लागते आणि घरात कलह वाढतो.
शास्त्रात असे म्हटले आहे की जे लोक मुक्या प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांना मारतात, त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. असे लोकं कधीच सुखी राहू शकत नाहीत आणि त्यांना अनेक दुःखांना सामोरे जावे लागते. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
सनातन धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. असे म्हणतात की जे पीपळाचे झाड तोडतात किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करतात त्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो. अशा लोकांवर शनिदेवाचा कोप होतो आणि त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
धार्मिक विद्वानांच्या मते, ज्या घरात वडीलधाऱ्यांचा अपमान होतो, तिथे शनि दोष सुरू होतो. अशा लोकांच्या घरातून हळुहळू संपत्ती ओसरू लागते आणि कुटुंबातील सदस्य कर्जाच्या जाळ्यात गुरफटत राहतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)