Shaniwar Upay: शनिवारच्या दिवशी केलेल्या ‘या’ उपायांनी होते आर्थीक समस्या दुर

ज्योतिष शास्त्रातही शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित काही खास उपाय.

Shaniwar Upay: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांनी होते आर्थीक समस्या दुर
शनिदेव
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 06, 2023 | 5:15 PM

मुंबई, शनिवार हा शनिदेवाला (Shanidev) समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, शनिदेवाची पूजा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. ज्योतिष शास्त्रातही शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित काही खास उपाय.

शनिवारशी संबंधित विशेष उपाय

  1. असे मानले जाते की शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना घोड्याचा जोडा अर्पण केल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.
  2. शनिवारी सकाळी लवकर उठून पिठात साखर आणि काळे तीळ मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. यासोबतच शनिदोष दूर करण्यातही हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
  3. काळे तीळ, काळी घोंगडी आणि उडीद डाळ यासारख्या काही खास गोष्टी शनिवारी गरीब किंवा गरजूंना दान केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो.
  4. जर तुम्हाला आयुष्यात खूप अपघात होत असतील तर अशा वेळी घरीच पोळ्या बनवा आणि त्यावर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे अपघात कमी होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील.
  5. जर एखाद्या व्यक्तीला घरात काही समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा आणि त्यात आपला चेहरा पहा. चेहरा पाहून ते तेल दान करा. असे केल्याने कौटुंबिक समस्या दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)