AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर होस्टेसने सर्वच सांगितलं…, विमानातून प्रवासी उतरल्यानंतर आतमध्ये फ्लाइट अटेंडेंट काय करतात? ऐकून…

विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्यानंतर एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्स विमानामध्येच का थांबतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर.

एअर होस्टेसने सर्वच सांगितलं..., विमानातून प्रवासी उतरल्यानंतर आतमध्ये फ्लाइट अटेंडेंट काय करतात? ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 7:15 PM
Share

विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरलं की अनेकांना वाटतं एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्सची जबाबदारी तिथेच संपते. मात्र वास्तव यापेक्षा वेगळं आहे. प्रवासी विमानातून उतरल्यावरही एअर होस्टेसवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. ज्या पुढील उड्डाण सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

विमानातून शेवटचा प्रवासी बाहेर पडताच फ्लाइट अटेंडंट्सचं काम पुन्हा सुरू होतं. केबिनची तपासणी, सुरक्षिततेशी संबंधित बाबी पाहणे, प्रवाशांनी मागे सोडलेल्या वस्तू तपासणे आणि पुढील प्रवासासाठी विमान तयार ठेवणे ही सर्व कामं त्यांच्या ड्युटीचा अविभाज्य भाग आहेत.

उड्डाणानंतरही सुरू असते महत्त्वाची जबाबदारी

गोल्ड विंग्सच्या एका अहवालानुसार, तब्बल 10 वर्षे एव्हिएशन क्षेत्रात काम केलेल्या एका महिलेने जिने फ्लाइट अटेंडंटपासून केबिन मॅनेजरपर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपले अनुभव शेअर केले आहेत. तिच्या मते, एका साधारण उड्डाणानंतरही एअर होस्टेसची भूमिका संपत नाही तर ती अधिक जबाबदारीची होते.

विमान ठिकाणी पोहोचताच सर्वप्रथम एअर होस्टेस प्रवाशांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने विमानातून खाली उतरण्यास मदत करतात. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी किती वेळ उपलब्ध आहे यावर त्यांची पुढील कामं अवलंबून असतात.

जर पुढील उड्डाणासाठी फक्त 30 मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळ उपलब्ध असेल तर अनेक वेळा एअर होस्टेस विमानातून बाहेरही पडत नाहीत. त्या थेट केबिनमध्येच थांबून पुढील प्रवासासाठी आवश्यक तयारी सुरू करतात. या वेळेत केबिन स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं जातं. अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना मदत करणं किंवा स्वच्छतेवर लक्ष ठेवणंही फ्लाइट अटेंडंट्सचंच काम असतं.

सुरक्षेपासून जेवणापर्यंत सर्व गोष्टींची तपासणी

विमान पुढील उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज आहे की नाही याची खात्री करणे ही एअर होस्टेसची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. केबिनमधील सुरक्षा उपकरणे योग्य ठिकाणी आहेत का, इमर्जन्सी उपकरणांची स्थिती, सीट बेल्ट, लाईफ जॅकेट्स यांची तपासणी केली जाते. याशिवाय, प्रवाशांसाठी दिलं जाणारं जेवण योग्य दर्जाचं आहे का, ते नियमानुसार लोड झालं आहे का, यावरही फ्लाइट अटेंडंट्स लक्ष ठेवतात.

या सर्व कामांसोबतच एअर होस्टेसना उड्डाणासंदर्भातील रिपोर्टही द्यावा लागतो. प्रवासादरम्यान घडलेल्या कोणत्याही विशेष घटना, प्रवाशांच्या तक्रारी, सुरक्षेशी संबंधित बाबी किंवा तांत्रिक निरीक्षणे यांचा उल्लेख या अहवालात केला जातो. हा अहवाल पुढील उड्डाणासाठी आणि एकूणच विमानसेवेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरतो.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश