AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या जन्मकुंडलीत शनि देवाची स्थिती कमकुवत असेल तर करा ‘हे’ उपाय

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल तर शनीदेवाला बलवान करण्याचे उपाय जाणून घेऊयात.

तुमच्या जन्मकुंडलीत शनि देवाची स्थिती कमकुवत असेल तर करा 'हे' उपाय
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 7:45 PM
Share

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. तसेच ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान देण्यात आले आहेत. कोणत्याही जन्म कुंडलित जेव्हा शनि शुभ स्थितीत असतो तेव्हा त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. तसेच शनिदेव हे असे एकमेव देव आहेत जे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले आणि वाईट फळ देतात, म्हणूनच शनिदेव हे नाव ऐकताच लोक घाबरतात, परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की चांगले कर्म करणाऱ्याला शनिदेव नेहमीच चांगल्या कर्मांवर शुभ फळे देतात.

दुसरीकडे, शनि वाईट कृत्ये करणाऱ्यांना कधीही क्षमा करत नाही आणि त्यांना आयुष्यात वाईट फळ मिळतेच. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण जन्मकुंडलीतील जर शनी देवाची जागा कमकुवत असल्यास कोणती लक्षणे आपल्याला जाणवतात तसेच कुंडलीत शनि बलवान करण्याचे कोणते उपाय करावे हे जाणून घेऊयात.

कुंडलीत शनी देवाची स्थिती कमकुवत असल्यास ही लक्षणे जाणतात

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत किंवा अशुभ असतो त्या व्यक्तीचे जीवन संकटांनी भरलेले असते. ती व्यक्ती अनेकदा वाईट संगतीत अडकते, दारू, सिगारेट आणि इतर वाईट सवयींचे व्यसन करतात. त्यांना वारंवार आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच कठोर परिश्रम करूनही अशा व्यक्तींना यश मिळत नाही. त्यांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते.

ज्यांच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत आहे त्यांना अनेकदा त्यांच्या घरात आणि कुटुंबात अशांतता येते. अशा व्यक्तींना अनेकदा इतरांकडून विश्वासघात होतो आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळत नाही.

कुंडलीत शनि बलवान करण्याचे उपाय

तुमच्या कुंडलीत शनि ग्रह बळकट करण्यासाठी, तुम्ही नेहमी कठोर आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आळस आणि कपट टाळा. शनिला प्रसन्न करण्यासाठी, शनिवारी काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करा. पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि त्याखाली दिवा लावा. गरीब आणि गरजूंना नेहमी मदत करा. तुमच्या घराची पश्चिम बाजू नेहमी स्वच्छ ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?