Shardiya Navratri 2021 : दुर्गा माता केवळ सिंहावरच आरुढ का होते, जाणून घ्या पौराणिक कथा

| Updated on: Oct 05, 2021 | 8:19 AM

हिंदू धर्मात सर्व देवी -देवतांचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक देवतांना त्यांच्या वाहनाच्या चित्रासह दाखवण्यात आलं आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये त्याच्याशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. शारदीय नवरात्र सुरु होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी नवरात्री 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे जी 14 ऑक्टोबर रोजी संपेल.

Shardiya Navratri 2021 : दुर्गा माता केवळ सिंहावरच आरुढ का होते, जाणून घ्या पौराणिक कथा
mata-durga
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात सर्व देवी -देवतांचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक देवतांना त्यांच्या वाहनाच्या चित्रासह दाखवण्यात आलं आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये त्याच्याशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. शारदीय नवरात्र सुरु होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी नवरात्री 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे जी 14 ऑक्टोबर रोजी संपेल.

या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक स्वरूपाचे स्वतःचे महत्त्व आणि कथा आहे. देवी दुर्गा तेज, शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. तिची सवारी सिंह आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देवाी दुर्गा सिंहावर स्वार का होतात? याच्याशी संबंधित आख्यायिका जाणून घेऊया.

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तप केले. एके दिवशी भगवान शिवाने विनोदाने देवी पार्वतीला काली म्हटले, ज्यामुळे पार्वती कैलास सोडून तपश्चर्या करायला निघून गेली. यानंतर एक भुकेला सिंह पार्वतीच्या मागे तिला आपले अन्न बनवण्यासाठी आला, पण तिला तपश्चर्येत पाहून तो वाट पाहत बसला.

पार्वतीला आपले अन्न बनवण्यासाठी सिंह कित्येक वर्षे उपाशी आणि तहानलेला तिथेच बसून होता आणि पार्वतीचे डोळे उघडण्याची वाट पाहत होता. पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला गौरव अर्थात गौरी होण्याचे वरदान दिले. यानंतर देवी पार्वती गंगेत आंघोळीसाठी गेली, त्यानंतर तिच्या शरीरातून एक सावळी मुलगी प्रकट झाली. जी कौशिकी किंवा गौरवर्ण झाल्यानंतर देवी गौरी म्हणून ओळखली जाऊ लागली.

सिंहालाही तपश्चर्येचे फळ मिळाले

सिंहाला भुकेलेला आणि तहानलेला बसलेला पाहून देवी पार्वती त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि त्याला वरदान म्हणून तिचे वाहन बनवले आणि तेव्हापासून देवी पार्वतीचे वाहन सिंह बनला.

दुसऱ्या कथेनुसार

स्कंद पुराणातील पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय याने राक्षस तारका आणि त्याचे दोन भाऊ सिंहामुखम आणि सुरापदनम यांचा देवसुराच्या युद्धात पराभव केला. सिंहामुखमने कार्तिकेयची माफी मागितली, ज्याने प्रसन्न होऊन त्याला सिंह बणवले आणि देवी दुर्गाचे वाहन बनण्याचा आशीर्वाद दिला.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

PHOTO | कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खास दागिन्यांची स्वच्छता, नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Best remedy for wealth : आर्थिक संकटांनी वेढलेले असाल तर हे सात उपाय करा, आर्थिक भरभराट होईल