
अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. 27 जूनच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिने अचानक जगाचा निरोप घेतला. त्यामुळे तिच्या कुंटुंबावर शोककळा पसरली आहे. गरुड पुराणात अचानक मृत्यूचे वर्णन करण्यात आहे, ज्याला ‘अकाली मृत्यु’असे म्हणतात. गरुड पुराणानुसार अकाली मृत्यु म्हणजे काय? अकाली मृत्युनंतर आत्म्याचे काय होते ते सविस्तर जाणून घेऊयात.
अकाली मृत्यु म्हणजे काय?
गरुड पुराणानुसार, अकाली मृत्यु जो कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे नसून अपघात, खून किंवा आत्महत्या यासारख्या अनैसर्गिक कारणांमुळे होतो. गरुड पुराणात अकाली मृत्युचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र अकाली मृत्यू हा व्यक्तीच्या कर्मानुसार विचारात घेतला जात नाही.
अकाली मृत्यु दोष म्हणजे काय?
शास्त्रांनुसार, असे मानले जाते की, ज्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो त्याचा आत्मा शरीर सोडतो मात्र हे जग सोडत नाही. तो उर्वरित आयुष्य पूर्ण करण्यासाठी या जगात भटकत राहतो. याला अकाली मृत्यु दोष असेही म्हणतात.
अकाल मृत्यु योग कसा तयार होतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, अकाल मृत्यु योगाला “अकाली मृत्युचा योग” असेही म्हणतात. जन्मकुंडलीतील काही ग्रहांच्या स्थिती आणि युतीमुळे अकाल मृत्यु योग तयार होतो. हा अकाल मृत्यु योग व्यक्तीच्या जीवनात अपघात, रोग किंवा इतर काही कारणांमुळे मृत्यूची शक्यता वर्तवतो.
अकाली मृत्युनंतर काय होते?
गरूड पुराणानुसार अकाली मृत्यूनंतर मृताच्या आत्म्याला दुःख सहन करावे लागते, कारण तो उर्वरित आयुष्य पूर्ण करण्यासाठी भटकत राहतो. असेही मानले जाते की, एखाद्या पुरूषाचा अकाली मृत्यू झाला तर तो भूत, आत्मा, पिशाच इत्यादींच्या योनीत भटकू शकतो. तसेच जर एखाद्या स्त्रीचा अकाली मृत्यू झाला तर ती चेटकीण किंवा देवीच्या योनीत भटकू शकते.
टीप : या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)