AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेसातीने असाल त्रस्त तर 15 जुलैला अवश्य करा हे उपाय, त्रासातून होईल मुक्तता

यावेळी ज्या राशींवर शनीची अडिचकी चालू आहे त्यांच्यासाठी शनि प्रदोष व्रत खूप फायदेशीर ठरेल. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या अडिचकीचा प्रभाव पडतोय. या शनि प्रदोष व्रतामध्ये मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी शनिदेवासह भोलेनाथाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा.

साडेसातीने असाल त्रस्त तर 15 जुलैला अवश्य करा हे उपाय, त्रासातून होईल मुक्तता
शनि प्रदोष
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 13, 2023 | 6:58 PM
Share

मुंबई : हिंदी भाषिकांचा श्रावण महिना सुरू आहे. श्रावण (Shrawan 2023) महिन्यात पूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावणातील महादेवाची पूजा सर्वोत्तम मानली जाते. श्रावणामध्ये  केले जाणारे प्रदोष व्रत देखील खूप महत्वाचे आहे. या येणारे प्रदोष व्रत शनिवारी पाळण्यात येत असल्याने याला शनि प्रदोष व्रत असेही म्हणतात. या दिवशी भोलेनाथसोबत शनिदेवाचीही पूजा करण्याचे महत्त्व आहे. जे लोकं शनि साडेसती आणि अडिचकीमुळे त्रासलेले आहेत, त्यांनी या दिवशी भोलेनाथ तसेच शनिदेवाची पूजा करून साडेसातीचा प्रभाव कमी करू शकतात. मासिक शिवरात्रीही शनि प्रदोष (Shani Pradosh Shrawan) व्रताच्या दिवशी येत असून, या दिवशी कंवर शिवलिंगाला जल अर्पण करवे. शनिवार 15 जुलै 2023 रोजी येणाऱ्या या शनि प्रदोष व्रतामध्ये भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच तुम्ही शनिदेवाचीही पूजा करू शकता. या दिवशी व्रत ठेवण्याचे खूप महत्त्व आहे.

या राशीच्या लोकांवर सुरू आहे अडिचकी

यावेळी ज्या राशींवर शनीची अडिचकी चालू आहे त्यांच्यासाठी शनि प्रदोष व्रत खूप फायदेशीर ठरेल. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या अडिचकीचा प्रभाव पडतोय. या शनि प्रदोष व्रतामध्ये मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी शनिदेवासह भोलेनाथाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा.

दुसरीकडे, ज्या राशींवर शनीच्या साडेसतीचा प्रभाव आहे त्यांनाही 15 जुलैला शनि प्रदोष व्रतात काही उपाय करावे. मकर, कुंभ, मीन राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. शनि प्रदोष व्रत केल्यास त्याचा प्रभाव कमी होतो.

या उपायांनी होईल लाभ

15 जुलै 2023, शनिवार हा एक खास दिवस आहे. या दिवशी प्रदोष काळात भोलनाथाची पूजा करावी, शिवाची पूजा करावी व व्रत करावे. तसेच शनि प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावा, काळे कापड बांधून शनिदेवाला उडीद डाळ अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर शनिदेवाची कृपा राहते, या दिवशी तुम्ही दोन देवांना एकत्र प्रसन्न करू शकता. अशी संधी फार कमी वेळा येते. श्रावणात येणारे हे शनि प्रदोष व्रत अतिशय शुभ आहे.

अशा प्रकारे करा पुजा

  • या दिवशी सकाळी भोलेनाथांना बेलपत्र, धतुरा अर्पण करा.
  • भोलेनाथांना जल व दुधाने अभिषेक करावा.
  • पूजेनंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी