Vivah Muhurta: सुरू झाला लग्नसराईचा सीझन! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाचे किती शुभ मुहूर्त?
देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे झाले आहेत. त्यामुळे आता लग्नसमारंभासह सर्व शुभ आणि मंगलकार्यांना सुरुवात झाली आहे. चला तर जाणून घेऊया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील विवाहाचे शुभ मुहूर्त.

हिंदू धर्मात देवउठनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा २० नोव्हेंबर २०२६ रोजी देवउठनी एकादशी साजरी करण्यात आली. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यासोबतच चातुर्मास संपतो आणि लग्न, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेक जण विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, डिसेंबरच्या मध्यापासून खरमास सुरू होणार असल्याने काही काळासाठी विवाहासह इतर मंगलकार्यांना विराम मिळेल. त्यामुळे या दोन महिन्यांतील विवाहाचे शुभ मुहूर्त आणि खरमास सुरू होण्याची तारीख जाणून घेऊया.
नोव्हेंबर २०२६ मधील विवाहाचे शुभ मुहूर्त
देवउठनी एकादशीनंतर नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी चार शुभ तारखा उपलब्ध आहेत. या तारखांना लग्नाचे नियोजन करता येऊ शकते.
• २१ नोव्हेंबर २०२६, शनिवार: सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपासून रात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत (२२ नोव्हेंबर).
• २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार: रात्री ११ वाजून २५ मिनिटांपासून सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत (२५ नोव्हेंबर).
• २५ नोव्हेंबर २०२६, बुधवार: सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.
• २६ नोव्हेंबर २०२६, गुरुवार: पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.
डिसेंबर २०२६ मधील विवाहाचे शुभ मुहूर्त
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांतही विवाहासाठी सात शुभ तारखा आहेत. त्यानंतर खरमास सुरू होणार असल्याने लग्नसमारंभ आणि इतर मंगलकार्यांना काही काळासाठी विराम मिळेल.
• २ डिसेंबर २०२६, बुधवार
• ३ डिसेंबर २०२६, गुरुवार
• ४ डिसेंबर २०२६, शुक्रवार
• ५ डिसेंबर २०२६, शनिवार
• ६ डिसेंबर २०२६, रविवार
• ११ डिसेंबर २०२६, शुक्रवार
• १२ डिसेंबर २०२६, शनिवार
डिसेंबरमध्ये कधी सुरू होणार खरमास?
हिंदू धर्मात खरमासाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतात, तेव्हा खरमास सुरू होतो. यंदा बुधवार, १६ डिसेंबर २०२६ रोजी खरमास सुरू होणार आहे. या दिवशी सकाळी साधारण १० वाजून २० ते १० वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर खरमास संपेल. म्हणेजच १४ जानेवारी २०२७, गुरुवारी, रात्री साधारण ९ वाजून १० मिनिटांनी खरमास समाप्ती होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)