Shukra-Shani Yuti : 28 एप्रिलला शुक्र-शनि येणार एकत्र, या तीन राशींना होईल असा फायदा
Venus Saturn Conjunction : आज 28 एप्रिलपासून शुक्र-शनि ग्रहाची युती होणार आहे. शुक्र आणि शनि ग्रहाच्या युतीमुळे 3 राशींना चांगला फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होणार आहे. जाणून घ्या त्या 3 राशी कोणत्या आहेत?

शुक्र आणि शनि हे 2 अतिशय मजबूत ग्रह मानले जातात. जेव्हा या शुक्र आणि शनि ग्रहाची युती होते तेव्हा अनेक राशीच्या लोकांचं नशीब फळफळतं. आता शुक्र आणि शनि ग्रहाचा 28 एप्रिलपासून मीन राशीच्या उत्तरा-भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश होणार आहे. या शुभ योगाचा प्रभाव 3 राशींवर होणार आहे. अर्थात या योगाचा फायदा 3 राशीच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात पदोन्नती मिळू शकते. तसेच नोकरीत पगारवाढीसह प्रमोशन मिळण्याचा योग आहे. कुटुंबियांसह बाहेर फिरायला जाऊ शकता. त्या 3 नशीबवान राशी कोणत्या आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
शुक्र-शनि युतीचा वृश्चिक, तूळ आणि वृषभ या 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे. शुक्र-शनि युतीचा कोणत्या राशीला कसा आणि किती फायदा होणार? हे आपण राशीनिहाय जाणून घेऊयात.
तुळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनि ग्रहाची युती अनूकुल राहणार आहे. शुक्र-शनिच्या युतीमुळे तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा होईल. त्यामुळे अनेक समस्या नाहीशा होण्यास मदत होईल. उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत तयार होतील. अनेक मार्गाने कमाई होईल. त्यामुळे तुमच्या कमाईत विक्रमी वाढ होऊ शकते. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीसाठी शुक्र-शनि ग्रहाची युती फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखा जॉब मिळू शकतो. स्वत:चा उद्योग-व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कुटुंबात शुभ-मंगळ कार्य होऊ शकतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यश मिळू शकतं.
वृषभ राशी
वृषभ राशीचा शुक्र-शनि ग्रहाच्या युतीमुळे 28 एप्रिलपासून सुवर्ण काळ सुरु होत आहे. वृषभ राशीची आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असेल. भाड्याचं घर सोडून स्वत:च्या घरात शिफ्ट होऊ शकता. लग्नासाठी तरुणीच्या शोधात असणाऱ्यांची प्रतिक्षा संपेल. कुटुंबियांसह चांगला वेळ घालवाल. समाजात तुमची पत वाढेल.
(Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)
