चांदीच्या कड्याचे आहेत फायदेच फायदे, अस्थिर मन होईल शांत, कोणते ग्रह होतात मजबूत?

ज्या लोकांचे चंद्र आणि शुक्र ग्रह कमजोर आहेत, अशा लोकांना चांदीचं कडं हातात घालण्याचा सल्ला दिला जातो, चांदीच्या कड्याचे अनेक फायदे आहेत, त्यातील काही फायद्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

चांदीच्या कड्याचे आहेत फायदेच फायदे, अस्थिर मन होईल शांत, कोणते ग्रह होतात मजबूत?
चांदीचे कडे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 27, 2025 | 8:01 PM

ज्योतिषशास्त्रामध्ये चांदीचं विशेष महत्त्व आहे. चांदीचा संबंध हा चंद्र ग्रहाशी असतो. चंद्र हा ग्रह मन, भावना, मानसिक शांती यांचं प्रतिक आहे. ज्यांचा चंद्र ग्रह कमजोर असतो, अशा लोकांना चांदीची एखादी वस्तू हातात घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. मग ही चांदीची वस्तू कोणतीही असू शकते, चांदीची चेन, अंगठी किंवा चांदीचं कडं. चांदीच्या कड्याबाबत बोलायचं झाल्यास चांदीच्या कड्याला हातत घालणं हे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं. आज आपण चांदीचं कडं हातात घातल्यामुळे नेमकं काय होतं? चांदीचं कडं हातात कोणी घालावं? त्याची योग्य पद्धत काय? चांदीच्या कड्यामुळे नेमके काय फायदे होतात? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चांदीचं कडं हातात घालण्याचे अनेक फायदे आहेत.

चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध हा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी असतो, त्यामुळे तुम्ही जर तुमच्या हातात चांदीचं कडं घातलं तर तुमचे दोन ग्रह मजबूत होतात. जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर असं मानलं जातं की तुमचा चंद्र ग्रह कमजोर आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या हातात चांदीचं कडं घातलं तर तुमचा चंद्र ग्रह मजबूत होतो, आणि तुमच्या मनातील निगेटिव्हिटी दूर होऊन, सकारात्मक विचार येतात. तसेच चांदीच्या कड्यामुळे तुमचा शुक्र ग्रह देखील मजबूत होतो. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग खुला होतो, तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतात, कामात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यावसायात यश मिळतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चद्र ग्रह हा तुमच्या मनावर परिणाम करणारा सर्वात प्रभावी ग्रह आहे, अशा स्थितीमध्ये चांदीच्या शितलतेमुळे तुमचं मन स्थिर राहण्यास मदत होते. तुमच्या मनावरील सर्व तणाव दूर होतो.

या राशीसाठी फायदेशीर

तुम्ही अनेकदा पाहायलं असेल की अनेक जण हातामध्ये चांदीचं कडं घालतात, त्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे चांदीमुळे तुमचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते, आरोग्याच्या समस्या दूर होतात. तसेच चांदीचं कडं जर तुम्ही नियमित वापरत असाल तर धनाची देवी लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांनी चांदीचं कडं आपल्या हातात घालणं शुभ मानलं गेलं आहे. चांदीचं कडं हे पुरुषांनी नेहमी डाव्या हातात घालावं, तर महिलांनी उजव्या हातात घालावं असं ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)