
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिवसा काळोखा पसरेल. थेट चश्मा किंवा इतर उपकरणांच्या मदतीने तुम्ही सूर्यग्रहण आरामात बघू शकता. 2026 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे. यामुळे खगोलीय दृष्ट्या या महिन्याता जास्त महत्व आहे. ग्रहण म्हटले की, शास्त्रज्ञांसाठी मोठा दिवस असतो, अनेक संशोधने यादरम्यान केली जातात. सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या भोवती अनेक बदल होतात. ज्याचा अभ्यास शास्त्रज्ञांकडून केला जातो. 17 फेब्रुवारीच्या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य पूर्णपणे काळा होईल आणि त्याच्या बाजूच्या भागाला प्रकाश दिसेल. या सूर्यग्रहणाला कंकणाकृती म्हटले जाते. यादिवशी फाल्गुन अमावस्या आहे आणि याचदिवशी हे ग्रहण दिसेल. तब्बल काही तास हे ग्रहण सुरू राहिल.
कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरूवात दुपारी 3.26 होईल आणि 5.12 पर्यंत सूर्य पूर्णपणे काळा होईल. यादरम्यान अंधार होईल. दिवसाच काळोखा होईल . सायंकाळी 7.57 ला सूर्यग्रहण संपेल. दिवसा अंधार होईल आणि सूर्याभोवती अनेक बदल आपल्याला बघायला मिळतील. 17 फेब्रुवारी 2026 च्या सूर्यग्रहणाबद्दल सर्वांनाच क्रेझ आहे आणि सर्वांनाच बघायचे आहे, हे अगदी बरोबर असले तरीही काही विशिष्ट ठिकाणीच हे ग्रहण दिसणार आहे.
सगळ्यांनाच हे ग्रहण बघता येणार नाही. अंटार्क्टिका, आफ्रिका, चिली आणि अर्जेंटिना याच भागात हे ग्रहण दिसणार आहे. यामुळे सूर्यग्रहणादरम्यान जरी दिवसा अंधार पडणार असला तरीही त्याचा अनुभव सर्वांनाच घेता येणार नाही. 17 फेब्रुवारी 2026 चे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. यामुळे भारतात दिवसा अंधार होणार नाही.
भारतीय लोकांमध्ये 17 फेब्रुवारी 2026 च्या ग्रहणाबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. मात्र, या उत्सुकतेवर पाणी फिरल्याचेही बघायला मिळत आहे. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. या वर्षात महत्वाचे काही ग्रहण असून 17 तारखेचे हे ग्रहण अत्यंत मोठे आहे. जवळपास तीन तास सूर्याच्या भोवताली मोठ्या आणि वेगवेगळ्या हालचाली आपल्याला बघायला मिळतील. थेटपणे आपण जरी हे ग्रहण बघू शकत नसलो तरीही त्यासंदर्भातील फोटो नक्कीच बघू शकतो.