8 एप्रिलला सूर्यग्रहण, दिवसा होणार पूर्ण अंधार, ‘या’ राज्यातील शाळा राहणार बंद, तुम्हीही…

| Updated on: Apr 04, 2024 | 5:51 PM

Solar Eclipse : होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची छाया बघायला मिळणार आहे. यामुळे काही राशींवर याचा थेट परिणाम देखील होणार आहे. हेच नाही तर काही देशांमध्ये 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण होणार आहे. यामुळे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येतंय. शाळांना सुट्टी देखील जाहिर करण्यात आलीये.

8 एप्रिलला सूर्यग्रहण, दिवसा होणार पूर्ण अंधार, या राज्यातील शाळा राहणार बंद, तुम्हीही...
Solar eclipse
Follow us on

8 एप्रिल 2024 हा दिवस अत्यंत मोठा आणि तितकाच महत्वाचा आहे. मात्र, अनेक ठिकाणी या दिवशी शाळांनी सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण होत आहे. मात्र, यादिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार होणार आहे. यामुळेच प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुट्टी जाहिर करण्यात आलीये. या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला झाकतो आणि दिवसा अंधार होतो. तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल.

8 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या या सूर्य ग्रहणादरम्यान अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिवसा पूर्ण अंधार होणार आहे. यामुळेच सुरक्षेसाठी म्हणून काही भागांमधील शाळांना सुट्टी देण्यात आलीये. हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे.

या ग्रहणामध्ये सूर्याच्या डिस्कचे 46 भाग अस्पष्ट होतील. हे ग्रहण मेक्सिको, डुरांगो, कोहुइला, टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, न्यू हॅम्पशायर, यूएस, ओंटारियो, क्यूबेक, न्यू ब्रन्सविक, प्रिन्स एडवर्ड आयलंड, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा येथे दिसणार आहे. यादिवशी लोक ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना देखील दिसतात.

तज्ज्ञांच्या मते, या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे अत्यंत मोठे नुकसान हे होऊ शकते. सात वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये हे दुसऱ्यांना युनायटेड स्टेट्समध्ये दुसऱ्यांदा सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक हे मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतील. यामुळे अमेरिकेत काही भागांमध्ये ट्रॅफिक जाम होऊ शकते.

तज्ज्ञांनी हे सूर्यग्रहण थेट पाहणे टाळण्याचा सल्ला देखील दिलाय. यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात. अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत. भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. अमेरिका आणि काही इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.