जर तुमच्या घरात कोळ्याचे जाळे वारंवार तयार होत असेल तर दुर्लक्ष नक्कीच करू नका, असू शकतात हे संकेत
वास्तुशास्त्रात नेहमी घराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. घर स्वच्छतेचा तर वास्तुशास्त्राशी फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे जर तुमच्या घरात वारंवार कोळ्याचे जाळे तयार होताना दिसत असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. वारंवार कोळ्याचे जाळे तयार होणे नक्की कसले संकेत दाखवतात हे जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रात नेहमी घराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. वास्तुशास्त्रात घरातील दिशा ते वस्तूंची दिशा, रंग या सर्वांसोबतच घरातील स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची मानली जाते. घराची वास्तु योग्य असेल तर जीवनाशी संबंधित अनेक समस्या आपोआप सुटतील. घर स्वच्छतेचा तर वास्तुशास्त्राशी फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे घरात स्वच्छता करताना, साफसफाई कराताना नेहमी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच योग्यरित्या घरातील योग्य स्वच्छतेच्या पद्धतीमुळे नकारात्मक ऊर्जाही निघून जाण्यास मदत होते.
दरम्यान अनेकदा आपण घर स्वच्छ करताना पाहतो कि भिंत आणि छतावर कोळ्याचे जाळे सतत तायर झालेले दिसते. स्वच्छ करूनही पुन्हा कोळ्याचे जाळे वारंवार तयार होत असेल तर ते खूप वाईट लक्षण मानले जाते. ते नेमके काय संकेत देतात हे जाणून घेऊयात.
कोळ्याचे जाळे हे संकेत देतात
शास्त्रांनुसार, ज्या घरांमध्ये कोळ्याचे जाळे आढळते तेथे देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी ते अडथळा ठरते. याचा अर्थ आर्थिक नुकसान होऊ शकते. पैशाशी संबंधित समस्या देखील सुरू होतात. अशा परिस्थितीत, घरातून कोळ्याचे जाळे ताबडतोब काढून टाकावे.
ग्रह दोष किंवा वाईट नजर
घरातील कोपरांत सतत कोळ्याचे जाळे तयार होत असेल हे घरात स्थिर ऊर्जा दर्शवते. यामुळे घरात ग्रह दोष किंवा वाईट नजर लागण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय, घरात कोळ्याचे जाळे असणे आरोग्यावर देखील परिणाम करते.
पूर्व आणि उत्तर बाजूला कोळीचे जाळे असणे अशुभ
घराच्या पूर्व आणि उत्तर बाजूला कधीही कोळीचे जाळे असू नये. यामुळे घरात सकारात्मक उर्जेच्या आगमनात अडचणी येतात. यानंतर, घरातील सर्व सदस्यांच्या जीवनात नकारात्मक परिणाम दिसून येतात.
घराच्या मुख्य दारावर कोळीचे जाळे असू नये
घराच्या मुख्य दरवाजावर कधीही कोळीचे जाळे असू नये. हे आणखी अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत, चुकूनही मुख्य दरवाजावर कोळीचे जाळे तयार होऊ देऊ नये.
हे उपाय उपयुक्त
दरम्यान यासंबंधी अनेक उपाय शास्त्रांमध्येही सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराची नियमित स्वच्छता करणेच सर्वात महत्त्वाचे आहे. घराचा प्रत्येक कोपरा दर 3 ते 4 दिवसांनी स्वच्छ करावा. तसेच मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी त्यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
