Spiritual: बुधवारी करा श्रीगणेशाची पूजा, मिळतील अलभ्य लाभ

| Updated on: Aug 10, 2022 | 9:54 AM

गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. बुधवारी श्रीगणेशाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख आणि संकट दूर होतात. तसेच तुमच्या कुंडलीत बुध दोष असेल तर तो देखील या दिवशी अनेक उपायांनी दूर करता येतो.

Spiritual: बुधवारी करा श्रीगणेशाची पूजा, मिळतील अलभ्य लाभ
Follow us on

श्रीगणेश (Shri Ganesh) हे सर्व प्रकारच्या अडथळ्यांना दूर करणारा, शुभाचा दाता, बुद्धी, समृद्धी आणि संपत्ती देणारा मानला जातो. बुधवार हा गणपतीला समर्पित मानला जातो. या दिवशी गणपतीची मनोभावे  पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. या दिवशी गणेशाचे काही उपाय करणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतात.  बुधवार (Budhwar Upay) हा गणपतीला समर्पित आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा नक्कीच केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. बुधवारी श्रीगणेशाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख आणि संकट दूर होतात. तसेच तुमच्या कुंडलीत बुध दोष असेल तर तो देखील या दिवशी अनेक उपायांनी दूर करता येतो. चला तर मग जाणून घेऊया बुधवारी गणपतीची पूजा कशी करावी आणि त्याचे उपाय-

बुधवारी करा हे उपाय करा

  1.  बुधवार हा दिवस गणपतीचा वार असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून या दिवशी गणपतीची आराधना करायची म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल. आपण आपल्या सोयीप्रमाणे पाठ करू शकता.
  2.  या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या आणि सामर्थ्यानुसार मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा.
  3.  बुधवारी काही पैसे किन्नर अर्थात तृतीय पंथींनी दान म्हणून द्यावा. नंतर त्यातून काही पैसे आशीर्वाद स्वरूप त्याच्याकडून पुन्हा घेऊन स्वतःजवळ ठेवावे. नंतर हे पैसे पूजा स्थळी ठेवून पूजा करून त्याला धूप उदबत्ती दाखवून त्यांना हिरव्या कपड्यात गुंडाळून घ्यावे. आता हे तिजोरी किंवा कपाटातील लॉकरमध्ये ठेवावे. किंवा आपण धन ठेवत असलेल्या ठिकाणी हे पैसे ठेवावे. याने भरभराटी येत.
  4.  आपण तांत्रिक उपाय करण्याच इच्छुक असाल तर या दिवशी 7 अख्ख्या कवड्या आणाव्या. या कवड्या पूजन सामुग्री मिळत असलेल्या दुकानात सहज मिळतात. यासोबत एक मूठभर हिरवे अख्खे मूग घेऊन दोन्ही वस्तू एका हिरव्या कपड्यात बांधाव्या. आता हे गुपचुप जाऊन एखाद्या मंदिराच्या पायर्‍यांवर ठेवून यावा. पण विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे याबद्दल चर्चा करू नये. हा उपाय करत असल्याचे कुणालाही सांगू नये. पण उपाय करताना मनात श्रद्धा असणे गरजेचे आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावी. हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. कर्जामुळे परेशान व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)